देशभरात दररोज १२००० ट्रेन धावतात. यामध्ये मालगाडीचा समावेश केला तर ही संख्या २३००० पेक्षा जास्त होईल. चोवीस तास एवढ्या मोठ्या संख्येत ट्रॅक्सवर ट्रेन धावत असतात. एका एका ट्रॅकवर ट्रेन थोड्या थोड्या अंतरावर धावत असतात. यामध्ये बरेचदा अपघातही होतात, तर कधी अचानक ट्रेन थांबवली जाते.यावेळी कधी सिग्नलमुळे ट्रेन थांबवली जाते तर कधी अपघातामुळे. अनेक वेळा प्रवासी ट्रेनची चेन खेचून ती थांबवितात आणि पळतात. परंतू पोलिस अशा व्यक्तीला सीसीटीव्ही आणि इतर साधनांद्वारे शोधून काढू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तीने जर विनाकारण सुरक्षा साखळी खेचली असेल तर त्याच्यावर रेल्वेच्या नियमानूसार कठोर कारवाई होऊ शकते.
मात्र आता विचार करा एखादी लोक इवलुश्या पक्षामुळे थांबली तर…हो एका छोट्याश्या पक्षामुळे लोकल खोळंबल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
प्रकरण लंडनच्या उपनगरातील बिशप स्टॉर्टफोर्ड स्टेशनचं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे उपस्थित असलेल्या एका हंसाने संपूर्ण रेल्वे मार्ग ठप्प केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक हंस रुळावर मुक्तपणे फिरताना दिसल्याने ते अडकून पडल्याचं बोललं जात आहे. हंसाला रुळावर पाहून पायलटला ट्रेन थांबवणं भाग पडलं. हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: लखनौमध्ये इंडियन ऑईलचा टँकर पलटी; पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी
सुदैवाने यामध्ये कोणतीही दर्घटना घडली नाही मात्र काहीवेळासाठी प्रवाशांची मात्र तारांबळ उडाली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
ट्रेनमध्ये केव्हा चेन खेचता येते ?
रेल्वेच्या नियमानूसार केवळ आपात्कालिन प्रसंगी ट्रेनची चेन खेचण्याची मूभा आहे. जर आपण ट्रेनमध्ये नातेवाईकाला सोडायला आलो आणि ट्रेनमध्ये त्याचे सामान ठेवण्यासाठी आत गेलो आणि अचानक ट्रेन सुटली तर तिला थांबविणे किंवा कुटुंबातील कोणी सदस्य फलाटावरच राहीला आणि ट्रेन सुटली तर तिला थांबविणे याकारणासाठी ट्रेनची साखळी खेचता येणार नाही. जर प्रवासात कोणाला इजा झाली वैद्यकीय मदत हवी असेल किंवा अपघात घडला तरच चेन खेचायला परवानगी आहे.