प्रसिद्धीसाठी मुंबईतील रेल्वेस्थानकांवर डान्स व्हिडीओ बनवणे एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना चांगलेच महागात पडले आहे. मुंबई आरपीएफने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सीमा कनौजियावर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आरपीएफने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकावर नृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता; ज्यामध्ये ती छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वेड्यासारखी नाचताना आणि प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्रास देताना दिसत होती.
त्यानंतर मुंबई आरपीएफने सीमा कनौजियाला बोलावून तिला माफीनामा पत्र लिहायला लावले आणि व्हिडीओद्वारे तिला तिची चूक मान्य करायला लावली. व्हिडीओमध्ये सीमा लोकांना सांगत आहे की, तिने सीएसएमटी स्थानकावर डान्स करून रील बनवली होती. त्यानंतर ही रील चांगलीच व्हायरल झाली. पुढे सीमा लोकांना आवाहन करते की, रेल्वेस्थानकांवर रील बनवू नका. कारण- हा एक दंडनीय गुन्हा आहे.
जगातील सर्वात उंच व्यक्ती अन् सर्वात बुटक्या व्यक्तीची झाली भेट, Video पाहून युजर्स थक्क; म्हणाले…
सीमाने असे विचित्र डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे अनेक क्रेझी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सीमा रेल्वेस्थानक, ट्रेन आणि इतर अनेक ठिकाणी तिच्या डान्सचे रील बनवते आणि सोशल मीडियावर अपलोड करते. सीमाच्या प्रत्येक रीलला चांगले व्ह्युज मिळतात; पण अनेक रीलमध्ये ती विचित्र कृत्य करताना आढळते. त्यामुळे मुंबई आरपीएफने तिला समुपदेशन करून चुकीची जाणीव करून दिली.
रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या रील डान्समुळे सीमा कनौजिया चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. या व्हिडीओमध्ये ती ‘मेरा दिल तेरा दीवाना’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. लोकांनी ही रील खूप वेळा पाहिली. त्यावर अनेकांनी चांगल्या-वाईट कमेंट्सही केल्या होत्या. सीमा तिच्या व्हिडीओ आणि फॅशनसाठी खूप प्रसिद्ध आहे. सीमा तिच्या विचित्र डान्सद्वारे लोकांचे खूप मनोरंजन करीत असते. इन्स्टाग्रामवर तिचे ५.५ लाख फॉलोअर्स आहेत.