सोशल मीडियावर रोज बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातल्या बऱ्याच मनोरंजन करणाऱ्या असतात, तर काही एखाद्या घटनेवर गांभीर्याने विचार करायला लावणाऱ्या असतात. यापैकी अपघाताचे देखील अनेक व्हिडीओ असतात. जे निष्काळजीपणामुळे काय होऊ शकते हे दर्शवणारे असतात. असाच एक तामिळनाडूमधील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेला दिसत आहे.
हा व्हिडीओ तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील आहे. या व्हिडीओमध्ये दोन आरपीएफ जवानांनी एका माणसाला चालत्या ट्रेनखाली येण्यापासून वाचवल्याचे दिसत आहे. आरपीएफ एएसआय अरुणजीत आणि महिला हेड कॉन्स्टेबल पीपी मिनी यांनी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तात्काळ धाव घेतली. या प्रयत्नात माहिला अधिकारी पीपी मिनी यांचा तोल जाऊन त्यादेखील मदत करत असताना प्लॅटफॉर्मवर पडल्याचे दिसत आहे. अखेर या दोन अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर खेचून त्याचा जीव वाचवण्यात यश मिळवले. आरपीएफ इंडियाने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण
आरपीएफ इंडियाने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडीओ :
‘शौर्य आणि धैर्याची आणखी एक कहाणी #Everydayheroes आरपीएफ एएसआय अरुणजीत आणि महिला हेड कॉन्स्टेबल पीपी मिनी यांनी कर्तव्य बजावत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोइम्बतूर स्टेशनवर ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या प्रवाशाला वाचवले’ असे कॅप्शन या ट्वीटमध्ये देण्यात आले आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :
आणखी वाचा : ‘साथी हात बढाना…’ मातीचे भांडे बनवतानाचा मांजरीचा हा भन्नाट Viral Video एकदा पाहाच
आणखी वाचा : पिल्लाला वाचवण्यासाठी या हत्तींनी लढवली अनोखी शक्कल; Viral Video एकदा पाहाच
हृदयाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.