भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी पादचारी पुल बांधण्यात आले असतानाही काही प्रवासी जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळ ओलांडतात. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रेनचा अंदाज न आल्याने अनेकांना प्राणही गमवावं लागलं आहे. रेल्वे रुळ ओलांडून मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या प्रवशांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मध्य प्रदेशच्या होसंगाबाद या स्थानकावरील अशीच एक थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन वृद्ध महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरून भरभाव वेगानं ट्रेन येत असते. पण स्थानकात ड्यूटीवर असणाऱ्या एका आरपीएफ जवानाला महिला रेल्वे रुळ ओलांडत असल्याचं दिसतं. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता कर्तव्यदक्ष आरपीएफ त्या दोन महिलांना हाताने पकडून तातडीनं रेल्वे स्थानकावर खेचतो. हा संपूर्ण थरार व्हिडीओच्या माध्यमातून आला असून महिलांचा जीव वाचवणाऱ्या आरपीएफचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
Video: धावत्या एक्स्प्रेससमोर रेल्वे रुळ ओलांडला, काही सेकंदातच RPF जवानाने दोन महिलांना वाचवलं, ट्विटरवर प्रवाशांना आवाहन
आरपीएफ जवानाने रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांचा जीव वाचवल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-12-2022 at 16:18 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpf saves two elderly women from crossing railway track in front of train hoshangabad railway station madhya pradesh viral video nss