अंकिता देशकर

Muslim Rally Video Making Communal Tension: लाइटहाऊस जर्नालिज्म ला सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडिओ समोर आला. मुस्लिम लोकांचा मोठा जमाव या व्हिडिओमध्ये आंदोलन करत असताना पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी जेव्हा एका आरपीएफ जवानाने मुंबई जयपूर एक्सप्रेसमध्ये मुस्लिम प्रवाशाची गोळी झाडून हत्या केली होती त्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा जमाव एकत्र आला असल्याचे म्हटले जात आहे. अशा प्रकारचे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ अनेक अकाउंटवरून शेअर केला जात आहे. व्हिडीओ मूळचा राजस्थान मधील असल्याचे सुद्धा सांगितले जातेय. यावरून अनेकजण जातीय वाद पेटवणाऱ्या कमेंट्स सुद्धा करत आहेत. नेमकं हे प्रकरण काय हे जाणून घेऊया..

Allu Arjun House Attack
Allu Arjun House Attack : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Rahul and Priyanka Gandhi ani
“राहुल व प्रियांका गांधींच्या विजयामागे कट्टरपंथी मुस्लीम आघाडीचा हात”, माकपाचा आरोप; नेमकं काय म्हणाले?
Image of AIMIM leader Akbaruddin Owaisi.
Pushpa 2 Stampede : “चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, अभिनेता म्हणाला चित्रपट हिट होईल”, नाव न घेता ओवैसींचा अल्लू अर्जुनवर आरोप
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
shahrukh khan Abhishek bachchan dance with children video viral
आराध्या-अबरामचा मंचावर, तर विद्यार्थ्यांबरोबर शाहरुख खान अन् अभिषेक बच्चनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”
Mahavikas Aghadi Protest March , Nagpur Winter Session , Mahavikas Aghadi Protest Nagpur,
Mahavikas Aghadi Protest March : ‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांनी विधानभवनात…

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Madhusudhan Konduri ने आपल्या प्रोफाइल वर व्हायरल दावा आणि व्हिडिओ शेअर केला.

इतर युजर्सही हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओमधून इन्व्हिड द्वारे स्क्रीन ग्रॅब्स काढणे आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च वापरून तपासाची सुरुवात केली. आम्हाला एक फेसबुक पोस्ट सापडली ज्यात हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

https://fb.watch/muQQ0a9OB8/

कॅप्शन चा अनुवाद होता: अलहमदुलिल्लाह, अनेक वर्षांनी बांगलादेश जमात-ए-इस्लामीच्या मोर्चाला परवानगी मिळाली. नारे तकबीर अल्लाहू अकबर.

हा व्हिडिओ ११ जुन रोजी फेसबुक वर शेअर करण्यात आला होता.यामुळे आम्हाला गुगल कीवर्ड सर्च वापरून इंटरनेटवर शोध सुरु केला.

आम्हाला या बाबतीत काही बातम्या सापडल्या.

https://ddnews.gov.in/international/bangladesh-jamaat-e-islami-holds-its-first-political-rally-after-decade

रिपोर्ट मध्ये म्हटले आहे: इस्लामी संघटना जमात-ए-इस्लामीने बांगलादेशमध्ये पुढील सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी करत शनिवारी ढाका येथे राजकीय मोर्चा काढला. २०१३ नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी रद्द केल्यानंतर जमात-ए-इस्लामीची ही पहिलीच राजकीय रॅली होती.

आम्हाला en.prothomalo.com वर देखील एक रिपोर्ट सापडला.

https://en.prothomalo.com/bangladesh/politics/y1tm85xe1u

रिपोर्ट मध्ये म्हटले आहे: पोलिसांनी अनेक अटींवर पार्टीला तोंडी परवानगी दिली. जमातनेही अटींचे पालन करत रस्त्यावर रॅली काढली. शनिवारी राजधानीतील इंस्टिट्यूशन्स ऑफ इंजिनियर्स बांगलादेश (IEB) येथे आयोजित मेळाव्यात पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले.

कीवर्ड शोधल्यावर आम्हाला त्याबद्दल काही ट्विट देखील सापडले.

त्यानंतर आम्ही ‘जमात-ए-इस्लामी रॅली’ उर्दूमध्ये भाषांतरित केले आणि ट्विटरवर कीवर्ड शोधले. यामुळे आम्हाला जूनपासून अनेक ट्विट करण्यात आले.

यातील बऱ्याच व्हिडिओ मध्ये आम्हाला व्हायरल व्हिडिओ सापडला.

हे ही वाचा<< भारतात ‘मुस्लिम एक्सप्रेस’ धावणार? ट्रेनचे दृश्य पाहून नेटकरी संतप्त; म्हणाले, “गार्डचं पण ऐकत नाहीत, स्टेशनवरच…”

निष्कर्ष: मुस्लिम जमावाचा व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा नाही तर बांगलादेशचा आहे. जमात-ए-इस्लामी, बांगलादेशच्या जून महिन्यात झालेल्या रॅलीचा व्हिडिओ राजस्थानच्या जयपूरचा म्हणून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

Story img Loader