‘आई’ म्हणजे आत्मा आणि ईश्वर. आई म्हणजे वात्सल्याचा झरा. आई म्हणजे ममता, प्रेम…खरं आई या दोन अक्षरी शब्दांची अर्थ सांगायला शब्द अपुरे पडतात. आई फक्त ९ महिने आपल्या लेकराला पोटात ठेवून जन्म देत नाही तर आयुष्यभर त्याला फुलासारखे जपते. लेकरासाठी ती कोणतेही कष्ट करण्यास तयार असते. जितके प्रेम आई आपल्या लेकरावर करते तितके कोणीही करू शकत नाही. आयुष्यात कोणतेही संकट आले तरी आई नेहमी नेहमी आपल्या बाळाचा विचार करते. “आपलं लेकरू घरी एकटं आहे”, या भीतीने व्याकूळ झाल्याने उंच बुरूज उतरून खाली आलेली हिरकणी देखील आई होती अन् लेकराला पाठीवर बांधून लढत युद्धात शत्रुशी लढणारी झाशीची राणी देखील एक आई होती. आजच्या काळात अनेक स्त्रिया नोकरी करत आपल्या लेकराला सांभाळतात. अशाच एका आईचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. चेंगराचेंगरीनंतर रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) एका महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या भयानक परिस्थितीत एक आरपीएफ अधिकारी आपल्या लेकराची काळजी घेत आपले कर्तव्य बजावले. हे स्त्री शक्तीचे एक अद्भुत उदाहरण आहे, जी जिला कर्तव्य कसे पार पाडावे हे माहित आहे.

आरपीएफ इंडियाच्या अधिकृत हँडलने कॉन्स्टेबल रीनाचा व्हिडिओ शेअर केला आहे, आपल्या मुलाला घेऊन कर्तव्य बजावल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल रीना तिच्या गणवेशात दिसत आहे. छातीशी बांधलेल्या कॅरियरमध्ये आपल्या बाळासह रेल्वे प्लॅटफॉर्मची तपासणी करताना दिसत आहे. RPF इंडियाने तिचे कौतुक करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “ती सेवा करते, ती संगोपन करते, ती सर्व काही करते – एक आई, एक योद्धा, परिस्थिती काहीही असली ती धैर्याने सामना करत आहे. 16BN/RPSF मधील कॉन्स्टेबल रीना तिच्या मुलाला घेऊन जाताना तिचे कर्तव्य बजावत आहे, दररोज कर्तव्याची जबाबदारी आणि मातृत्व दोन्हीमध्ये संतुलन साधणार्‍या असंख्य मातांचे ती प्रतिनिधित्व करते आहे.”

अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या धाडसाबद्दल कौतुक केले, तर काहींनी तिच्या मुलाचा जीव धोक्यात घालल्याबद्दल टीका केली. “दिल्ली आणि पटना येथे आपण जे पाहीले त्यानंतर, ती तिच्या मुलाला धोक्यात घालत असेल का? बहुतेकदा, आरपीएफकडे सर्व स्थानकांवर कार्यालयाची जागा असते, फक्त लहान मुलांसाठी जागा बनवल्याने मदत होऊ शकते, कारण जर कोणत्याही कर्मचार्‍यांकडे बाळ असेल तर त्यांना कामावर आणण्याची आवश्यकता असेल तर मदत होईल” एका वापरकर्त्याने लिहिले.

“तिच्याकडे पर्याय आहेत. ती जे निवडले आहे ते ती करत आहे,” दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी केली.

“तुम्हाला नारीशक्ती म्हणण्यास लाज वाटली पाहिजे. बाळाला जन्म देताना नारीशक्ती आधीच दिसून आली आहे. ती जे करत आहे ते तिच्या कामावर अन्याय आहे आणि त्याच वेळी बाळाला धोक्यात घालत आहे,” तिसर्‍या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभाला निघालेल्या प्रवाशांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. या घटनेत किमान १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

Story img Loader