आजच्या काळात पैसे कमावण्यासाठी सर्वच जण संघर्ष करत आहे. कोणी स्वत:च्या व्यवसायात कष्ट करत आहे तर कोण नोकरीमध्ये. व्यवसाय असो किंवा नोकरी महिन्याचा खर्च भागवण्यासाठी जे पैसे हातात येतात महिन्याच्या शेवटपर्यंतही पुरत नाही. ‘पगार आला की कुठे जातो कळतच नाही हे वाक्या आपल्या आसापास आपण अनेकदा ऐकतो.” प्रत्येक व्यक्ती पगार आला की आपल्या महिन्याचे महत्त्वाचे खर्च भागवतो, चार पैसे बाजूला ठेवतो आणि पुढचा पगार येइपर्यंत भागेल एवढे पैसे हातात ठेवतो. पण हे गणित झाले सर्वसामान्य व्यक्तीचे ज्याच्याकडे पैसे कमी आणि खर्च जास्त असतात. पण काही लोक असेही असतात ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असो किंवा नसो त्यांना त्यांच्या हौस मौज पूर्ण करायच्या असतात. सध्या एका व्यक्तीने त्याच्या मित्राचा किस्सा सांगितला आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

एका माणसाने त्याच्या मित्राच्या लग्नाच्या भव्य खरेदीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याने काही मिनिटांतच ₹४०,००० पेक्षा जास्त खर्च केला केला. एका रेडिट वापरकर्त्याने त्याच्या लवकरच लग्न होणाऱ्या मित्राबरोबर खरेदीला जाण्याचा एक आश्चर्यकारक अनुभव शेअर केला ज्यामुळे त्याला त्याच्या आर्थिक ध्येयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पोस्टने लवकरच लक्ष वेधले, अनेकांनी पिढीजात संपत्ती आणि आर्थिक जबाबदारी यांच्यातील तीव्र फरकावरून नेटकऱ्यांमध्ये वाद पेटला आहे.

वापरकर्त्याने एलांटे येथील दा मिलानो येथे झालेल्या भव्य शॉपिंग ट्रिपची आठवण सांगितली, हे एक लक्झरी स्टोअर आहे जे त्याच्या उच्च दर्जाच्या इटालियन लेदर उत्पादनांसाठी ओळखले जाते. “त्याने कसला विचार न करता ₹२८,००० मध्ये रोसो ब्रुनेलो शूजच्या दोन जोड्या खरेदी केल्या,” वापरकर्त्याने लिहिले.

हा उत्साह एवढ्यावरच थांबला नाही. मित्राने ₹९,८०० किमतीचा यवेस सेंट लॉरेंट परफ्यूम आणि ₹३,४०० किमतीचा फेसवॉश देखील घेतला. हे सर्व एकाच वेळी, कोणताही भावतोल न करता किंवा कसलाही संकोच न करता. त्याने ते बघितले आणि त्यांना ते पॅक करण्यास सांगितले, त्याचे कार्ड स्वाइप केले आणि बॅग उचललीच” असे वापरकर्त्याने लिहिले.

A month's salary spend in 30 minutes!
byu/Easy_Shape5564 inChandigarh

या शो ऑफमुळे वापरकर्ता खोल विचारात बुडाला. “माझ्या पालकांनी माझ्यासाठी जे काही बनवले आहे त्यात मी समाधानी आहे. आता त्याच्या पिढीजात संपत्तीकडे पाहताना मी या विचारात हरवून गेलो की,” अरे देवा! मी एवढे पैसे कसे कमावून शकतो की मला कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी त्याची किंमत पहावी लागणार नाही.”

या पोस्टमुळे ऑनलाइन चर्चा सुरू झाल्या, ज्यामध्ये वापरकर्त्यांनी आर्थिक सुविधा, संपत्तीच्या आकांक्षा आणि वेगवेगळ्या आर्थिक पार्श्वभूमीच्या वास्तवावर विचारम मांडले.

एका वापरकर्त्याने लिहिले, “मी अशा प्रकारे अनेक अनुभव आले आहे. माझा एक नातेवाईक लंडनमध्ये खरेदी करण्यासाठी जातो कारण त्याला वाटते की त्याला तिथे चांगले ऑफर मिळतात. पण गोष्ट अशी आहे की, मी असे बरेच लोक पाहिले आहेत जे आपल्यापेक्षा १०-१०० पट कमी सुविधा असलेले आहेत. त्यावेळी मला माझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटते आणि मला जे हवे आहे त्यासाठी मी काम करतो.”

दुसऱ्याने पुढे म्हटले, “त्यांच्या संगोपनामुळे आणि मूल्यांमुळे, जरी त्यांना भरपूर संपत्ती वारशाने मिळाली असती, तरी त्यांनी ती भव्य, भौतिक गोष्टींवर खर्च केली नसती. ते साध्या, मूलभूत वस्तूंवर समाधानी असत.

एका वापरकर्त्याने लिहिले, “जीवनशैलीत फरक आहे. मी माझ्या २५० रुपयांच्या फेसवॉशबद्दल प्रामाणिकपणे ठीक आहे, ते चांगले काम करते. परफ्यूममध्ये गुंतवणूक करणे चांगली गोष्ट आहे पण मी पैसे कमवत नाही म्हणून माझ्याकडे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया नाही..”

Story img Loader