आतापर्यंत आपण एखाद्या सिनेमाच्या निर्मितीसाठी, लोकोपयोगी प्रकल्पांसाठी, सेवेसाठी इतकंच नाही तर लग्नसोहळ्यासाठी कोट्यवधी खर्च केल्याचं ऐकलं असेल, पण कधी अंत्यसंस्कारासाठी साडेपाचशे कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याचं ऐकलंय का? पण थायलंडने आपल्या लाडक्या राजाच्या अंत्यसंस्कारासाठी तब्बल ५८५ कोटी खर्च केल्याचं म्हटलं जात आहे.
थायलंडचे राजे भूमीबोल अदुल्यदेज यांचं गेल्यावर्षी निधन झालं. भूमीबोल यांच्याविषयी जनतेच्या मनात एक वेगळाच आदर होता. आपल्या प्रजेची मनं जिंकण्यात भूमीबोल यांना यश आलं, अनेकांसाठी तर ते देवच होते. ७० वर्षांहून अधिक काळ भूमीबोल यांनी थायलंडवर सत्ता गाजवली. १३ ऑक्टोबर २०१६ मध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण आता वर्षभरानंतर २६ ऑक्टोबरला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुढचे दोन दिवस हा विधी सुरू राहणार आहे.
अपघातात मुलगा गमावलेल्या दाम्पत्यानं ‘अशी’ जिवंत ठेवली त्याची आठवण
थायलंडच्या पारंपरिक रितीरिवाजानुसार त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पारंपरिक वेश परिधान करून थायलंडचं राजकुटुंब आणि सैनिक उपस्थित असतील. त्यानंतर राजांच्या स्मरणार्थ वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.
ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, तिथे सोन्याचा कळस असलेली प्राचीन थाय पद्धतीची इमारत उभारण्यात आली आहे. अंत्यसंस्काराची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू असून, हजारो कारागीर दिवस-रात्र त्यासाठी काम करत आहेत. अडीच लाखांहून अधिक लोक त्यांच्या अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जगभरातील अनेक मोठे नेते आणि शाही कुटुंबातील सदस्यदेखील राजाच्या अंत्यसंस्कारासाठी येणार आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सरकारने १ दिवसाची सुटीदेखील जाहीर केली आहे.
Video : अन् स्टार फिश चालू लागला, दुर्मिळ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल