भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने यानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमांमध्ये ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीयांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. मोदींनी याच दिवशी स्वत:चा डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी बदलला. त्याचबरोबर त्यांनी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचं आवाहन केलं. याच सर्व पार्श्वभूमीवर भाजपाची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटो बदलून तिरंगा डीपी ठेवला आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली? जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा