Viral Video: आपल्यातील अनेकांनी रुबिक क्यूबचे कोडं एकदा तरी सोडवण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला असेल? बहुतांश जणांना हे कोडं सोडवायला पहिल्या प्रयत्नात जमत नाही. पण, काही जण याला अपवाद असतात. अनेक जण बुद्धीचा कसं लावून झटपट रुबिक क्यूबचे कोडं सोडवून दाखवतात. तर आज सोशल मीडियावर रुबिक क्यूबचे कोडं सोडवण्यासाठी एक जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.
व्हिडीओत एक व्यक्ती रुबिक क्यूब हातात घेऊन बसला आहे. तसेच समोर एक मोबाइल ठेवला आहे. रुबिक क्यूबची ज्याप्रकारे रचना असते, त्याप्रमाणे व्यक्ती मोबाइलमध्ये दिसणाऱ्या रुबिक क्यूबची रचना करून घेते. त्यानंतर व्यक्ती एक बटण दाबते आणि रुबिक क्यूब सॉल्वर कोडं कसं सोडवायचं हे टप्प्याटप्य्याने दाखवते. नक्की कशाप्रकारे रुबिक क्यूबचे कोडं व्यक्तीने सोडवलं आहे, एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
रुबिक क्यूब सॉल्वर कोडं सोडवून दाखवते आहे. मोबाइलमध्ये ज्याप्रकारे दाखवलं जात आहे, अगदी त्याचप्रमाणे व्यक्ती कोडं सोडवण्यास सुरुवात करते आणि अखेर रुबिक क्यूब सॉल्वर कोडं सोडवण्यात यशस्वी होते. या व्हिडीओमध्ये ट्विस्ट आहे, तो पाहून तुम्ही नक्कीच थक्क झाला असाल एवढं नक्की.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @PicturesFoIder या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आता कोडं सोडवण्यात गोंधळ उडणार नाही’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी या व्यक्तीचे कौतुक करताना दिसून आले आहेत. तसेच व्यक्तीच्या कल्पकतेचं कौतुक करताना व कोडं सोडवण्याच्या या भन्नाट उपायाची प्रशंसा करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. याआधीसुद्धा मुंबईतील सायबर सुरक्षातज्ज्ञ चिन्मय प्रभू यांनी ३२.६९ सेकंदात रुबिक क्यूबचे कोडे सोडवून दाखवले होते आणि गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डसचा किताब जिंकला होता. तर आज या व्यक्तीने चक्क रुबिक क्यूबचे कोडं सोडवण्यासाठी जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.