Rude Rickshaw Driver Viral Post: महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत रिक्षावाले, फेरीवाले अगदी मुंबई लोकलच्या ट्रेनमधील सहप्रवाशांशी सुद्धा सवयीने हिंदी बोललं जातं, अगदीच एखाद्या थिईकानी पॉश दिसून यायचं असेल तर हुशारी दाखवत काहीजण तोडक मोडकं का होईना इंग्रजी बोलतात. पण आपल्या मातृभाषेत संवाद साधणं अनेकजण विसरले आहेत. सुरुवातीला यासाठी अनेक आंदोलने, वाद झाले पण तरीही सवय काही केल्या जात नाही म्हणतात तसंच काहीसं मराठीच्या बाबत होत गेलं. महाराष्ट्राच्या तुलनेत मातृभाषेत संभाषणासाठी दाक्षिणात्य राज्य बरीच आग्रही असतात. पण हा आग्रह उद्दामपणाकडे वळवत एका रिक्षावाल्याने प्रवाशांचा अपमान केल्याचा प्रकार सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टमध्ये रिक्षाचा फोटो व्हायरल होत आहे . या रिक्षावर लिहिलेल्या तीन ओळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बहुतांशवेळा रिक्षा, ट्रकवर लिहिल्या जाणाऱ्या गोष्टी या चेहऱ्यावर हसू आणतात पण यावेळेस मात्र या ओळींनी प्रवासी चांगलेच भडकले आहेत. या रिक्षावाल्याने कन्नड भाषिक नसलेल्या प्रवाशांना उद्देशून हा मेसेज लिहिला आहे. तो लिहितो की, “तुम्ही कर्नाटक मध्ये आहात तर कन्नडमध्येच आमच्याशी बोला, आम्हाला तुमचा माज दाखवू नका, तुम्ही आमच्याकडे भीक मागायला आला आहात.” असं लिहिताना मधील काही वाक्यांमध्ये या रिक्षावाल्याने शिव्या सुद्धा लिहिल्या आहेत.

a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
traffic e-challan
ई-चलन घोटाळ्यापासून सावध रहा! ट्रॅफिक चलनच्या नावाखाली होतेय फसवणूक, कसे टाळावे?
Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
man light a small rocket using Alexa
“अलेक्सा रॉकेट लाँच कर…” मालकाने सूचना देताच फटाके फोडण्यासाठी Alexa तयार, पाहा दिवाळीचा हा खास VIRAL VIDEO
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा
Accident Viral Video
प्रत्येकवेळी नशीब साथ नाही देत मित्रा; भर वेगात चार कार आमने-सामने; VIDEO पाहून सांगा चूक नक्की कुणाची?

ही पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी या रिक्षावाल्यावर सडकून टीका केली आहे. “इतरांना माज करू नका शिकवतानातू स्वतःचा माज दाखवतोयस हे बघ, तू काय मोठी मर्सिडीज चालवतोयस का? अशा आशयाच्या कमेंट्स या पोस्टवर रिक्षावाल्याला उद्देशून करण्यात आल्या आहेत. एखादी भाषा येत नसणे हा काही गुन्हा नाही, समोरचा माणूस कोणत्याही भाषेत बोलत असेल तरी तो तुम्हाला मान सन्मानाने वागवतोय का हे पाहणे गरजेचे आहे असेही काहींनी लिहिले आहे.

ही पोस्ट शेअर करणाऱ्या @Ravisutanjani ने सुद्धा कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा आग्रह दाक्षिणात्य राज्यांमध्येच अधिक असतो, उत्तरेकडील राज्यात लोकं समोरच्याच्या सोयीला अधिक प्राधान्य देतात तसेच मदतीला तत्पर असतात. “तुम्हाला या पोस्टविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा.