सध्या युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धामुळे भारतामधील वैद्यकीय शिक्षण हा सुद्धा एक महत्वाचा चर्चेचा विषय ठरत आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मागील काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगाअंतर्गत मोहीम राबवली जात आहे. (युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा) युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या परदेशी मुलांच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये चीन पहिल्या स्थानी आहे.
नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार १८ हजारच्या आसपास भारतीय विद्यार्थी या देशात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. याच गोष्टीची युद्धाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनी दखल घेतलीय. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी तिथे अडकल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि वैद्यकीय शिक्षण यासंदर्भात आता आनंद महिंद्रांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी महिंद्रा ग्रुपच्या माध्यमातून भारतामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी चाचपणी करण्याचे निर्देश दिलेत.
नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”
आनंद महिंद्रांनी एका वृत्तपत्रामधील वैद्यकीय अभ्यासासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या आकडेवारीसंदर्भातील इन्फोग्राफिक्सवर महिंद्रांनी प्रतिक्रिया दिलीय. “मला अजिबात कल्पना नव्हती की भारतामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची एवढी कमतरता आहे,” असं महिंद्रांनी ट्विटमध्ये म्हटलंय. त्याचबरोबर त्यांनी टेक महिंद्राचे व्यवस्थापकीय निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी. प. गुरनानी यांना महिंद्रा विद्यापिठामध्ये एखादं वैद्यकीय शिक्षण देणारं कॉलेज सुरु करता येईल का यासंदर्भात चाचपणी करण्यास सांगितलेय.
नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका
त्यामुळे लवकरच महिंद्रा समुहाकडून एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेची घोषणा झाल्यास आश्चर्य वाटू नये असं काही युझर्सने म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आपली मुलं देशाबाहेर जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच देशातील खासगी श्रेत्राने याबाबतीत पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं होतं.
नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…
अनेकांनी आनंद महिंद्रांच्या या ट्विटवर सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांच कौतुक केलंय. तसेच जर हे महाविद्यालय सुरु करणार असाल तर फी कमी ठेवावी अशी मागणीही अनेकांनी केलीय. “९ ते १० लाख विद्यार्थी दरवर्षी परदेशामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा शिक्षणासाठी जातात. ही फार मोठी संख्या आहे. तुमच्यासारख्या श्रीमंत व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान दिलं तर त्याचा मोठा परिणाम आपल्या जीडीपीवर होईल. आपल्या देशातून बाहेर जाणारा बराच पैसा वाचेल,” असं एकाने म्हटलंय.
रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतरही आनंद महिंद्रांनी युद्धाबद्दल चिंता व्यक्त केलेली. आपण स्वत: १९६५ आणि १९७१ अशा दोन युद्धांचा अनुभव घेतलाय, असं आनंद महिंद्रा म्हणाले होते. युद्धामधून जगाने काही बोध घेतलाय असं दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता.