युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरु केलीय. या मोहिमेअंतर्गत रविवारपर्यंत ६८८ भारतीय नागरिक रुमानियाची राजधानी बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एअर इंडियाच्या तीन विमानांतून देशात परत आले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने सुरु केलेल्या या मोहिमेच्या नावाने जाहिरातबाजी केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर या मोहिमेचं नाव उत्तर प्रदेश निवडणूक डोळ्यासमोर ठेवत देण्यात आल्याचाही आरोप केलाय. एकीकडे राजकारण्यांकडून टीका होत असतानाच दुसरीकडे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनीही थेट पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत ते उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने आम्ही इथे अडकल्याचा टोला लागवालाय. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अडकलेल्या तरुणीने दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

Canada
Indian students in Canada : भारतातून कॅनडात गेलेल्या २० हजार विद्यार्थांची महाविद्यालयांना दांडी, आकडेवारी आली समोर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
School teacher dance on marathi song Mi Haay Koli song with student school video goes viral on social media
“मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी..”जिल्हा परिषद शाळेत सरांचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स; VIDEO व्हायरल
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Image of Indian nationals returning home or a related graphic
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात केरळच्या तरुणाच्या मृत्यूनंतर भारत आक्रमक, युद्धात लढत असलेल्या भारतीयांना परत पाठवण्याची मागणी
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Road tax collection, heavy vehicles, Mumbai,
मुंबईच्या वेशीवर जड-अवजड वाहनांकडून २०२७ नंतरही पथकर वसुली?
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा

नक्की वाचा >> Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने युक्रेन सीमेजवळ आलेल्या भारतीय विद्यार्थिनीला भारतीय दुतावासाकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भात विचारलं असताना तिने संतापून थेट पंतप्रधानांना काही प्रश्न विचारलेत. “भारतीय दुतावासाकडून नवीन सूचना आल्या आहेत याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता. “काही वेळापूर्वीच मी ते वाचलं. त्यात म्हटलंय की बॉर्डवरुन आम्हाला बाहेर काढलं जाईल. मी एक विचारु इच्छिते की आज एवढे भारतीय येथे अडकले आहेत. मोदीजी एवढ्या दिवस तुम्ही कुठे होता?, एक महिना तुम्ही उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये व्यस्त होता. तुम्ही नक्की कुठे होता?,” असं या तरुणीने विचारलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “चला त्यांना नरकात…”; देशात घुसलेल्या रशियन सैन्याची दिशाभूल करण्यासाठी युक्रेन सरकारचं अनोखं आवाहन

तसेच पुढे बोलताना या तरुणीने, “आज इथे कोणी अमेरिकन नागरिक का अडकून पडलेले नाहीत? बायडेन यांना कळलं आणि तुम्हाला कसं नाही कळलं? आम्ही सतत तुम्हाला ईमेल करत होतो. भारतीय दुतावासाच्या संजय रावत यांच्याशी संपर्क होत नव्हता एवढ्या दिवस. आम्ही अनेकदा प्रयत्न केले,” असंही म्हटलंय.

त्याचप्रमाणे, “तुम्ही म्हणालात बॉर्डवर या. आम्ही बॉर्डवर आलोय. आता पुढे काय? इथे दोन लोक आहेत. दोन लोक २० हजार जणांना बाहेर काढणार का?,” असा प्रश्न या तरुणीने विचारलाय.

नक्की पाहा >> Video: रणगाडा बंद पडल्याने अडून पडलेल्या रशियन सैनिकांजवळ येऊन युक्रेनियन चालक म्हणाला, “मी तुम्हाला…”

१६ हजार विद्यार्थी अडकले…

रशिया-युक्रेन युद्धात सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सरकारला तेथील भारतीय नागरिकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, हे सर्व विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रस्ते मार्गाने तिथून बाहेर काढण्याची योजना भारत सरकारने आखली आहे.

Story img Loader