समुद्रकिनारी वावरताना योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असते अन्यथा आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते. अनेकदा समुद्र किनारी होणाऱ्या अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हिडीओची सर्वत्र चर्चा होत आहे. एका २४ वर्षीय तरुणी थायलंडमधील कोह सामुई येथे एका खडकावर योगाभ्यास करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कामिला बेल्यातस्काया असे या तरुणीचे नावर असून रशिया येथील नोवोसिबिर्स्क येथील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. समुद्रकिनारी एका खडकावर योगाभ्यास करत असताना एका महाकाय लाट आली अन् होत्याचे नव्हते झाले. अचानक आलेल्या मोठ्या आलेल्या लाटेसह तरुणी समुद्रात वाहून गेली. काही कळण्याआधीच ती दिसेनाशी झाली. हा अपघात व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. धक्कादायक व्हिडीओमध्ये समुद्राच्या महाकाय लाटेने तिला समुद्रात खेचल्यानंतर ती जगण्यासाठी संघर्ष करताना दिसत होती.

Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
when abhishek Bachchan met kareena Kapoor she rolls her eyes at award show video goes viral
Video: अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Shocking video of a baby girl caught fire viral video on social media
त्याची एक चूक अन् चिमुकली आगीत अक्षरश: होरपळली; घरात लहान मुलं असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO
Malkin Bai Written behind Car form Pune
प्रेम करावं तर पुणेकरांसारखं! मालकीणबाईसाठी काहीपण, Video Viral एकदा बघाच
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

बेल्यात्स्काया ही आपल्या प्रियकराबरोबर सुट्टीचा आनंद घेत होती. सोशल मीडियावर कामिलाने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये, कोह सामुई हे “पृथ्वीवरील सर्वोत्तम ठिकाण” आणि तिने या ठिकाणाला आपले “घर” मानले असे वर्णन केले होते.

हेही वाचा –Viral Video: भरधाव वेगाने येणारा दुचाकीस्वार थेट जाऊन दुभाजकला धडकला, दुचाकीसह हवेत उडला अन् ट्रक… काळजात धडकी भरवणारा अपघात

आपल्या लाल कारमध्ये योगा मॅट घेऊन लाड को व्ह्यू पॉईंटवर ती पोहचली होती. खडकांवर बसून योगाभ्यास करत होती आणि काही क्षणांनंतर, तिला एका शक्तिशाली लाटेने वेढले. १५ मिनिटांत बचाव पथके घटनास्थळी पोहोचली, पण नऊ फूट उंच लाटांनी तिला वाचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अडथळे आणले. जिथून ती वाहून गेली होती तिथून दोन तृतीयांश मैलावर तिचा मृतदेह सापडला. शोध दरम्यान फक्त तिची गुलाबी योगा मॅट खवळलेल्या समुद्रांच्या पाण्यात दिसत होती.

हेही वाचा – “आता हेच पाहणे बाकी होते”, चक्क बटरमध्ये भाजला आईस्क्रिम पाव, Viral Video पाहून संतापले नेटकरी


बेल्यात्स्कायाची सुटका करण्यासाठी एका प्रेक्षकाने खवळलेल्या समुद्राचा सामना केला परंतु तो अयशस्वी झाला. डेली स्टारच्या वृत्तानुसार त्या माणसाची सध्याची परिस्थिती किंवा त्याचे काय झाले हे अद्याप कळलेले नाही.

एका प्रत्यक्षदर्शीने या दृश्याचे वर्णन केले: “मी एक सेकंदासाठी दूरवर नजर फिरवले आणि जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा एका लाटेने मुलीला वाहून नेले होते.उंच खडकावर बसलेला तिचा प्रियकर मदतीसाठी ओरडत होता.”

स्थानिक नागरिकांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मॉन्सूनमध्ये आम्ही पर्यटकांना वारंवार चेतावणी देतो, विशेषत: चावेंग आणि लामाई समुद्रकिनारे यांसारख्या जास्त धोका असलेल्या भागात जेथे लावण्यात आलेले लाल ध्वज पोहण्यासाठी सुरक्षित ठिकाण नाही याचे देतात.”

त्याने जोडले की, घटनास्थळ हे पोहण्यासाठी योग्य क्षेत्र नव्हते पण एक निसर्गरम्य ठिकाण होते, ज्यामुळे कदाचित बेल्यात्स्कायाने तिच्या सुरक्षेचा विचार केला नसवा. या शोकांतिकेने स्थानिक अधिकाऱ्यांना लाड को व्ह्यू पॉईंट खाली असलेल्या खडकाळ भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यास प्रवृत्त केले आहे.

द मिरर नुसार, थायलंड हे रशियन लोकांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, गेल्या वर्षी १.४८ दशलक्षाहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. ज्यामध्ये अनेकांनी युक्रेनमधील व्लादिमीर पुतिनच्या युद्धात सहभागी होण्याचे टाळले आहे.