रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी मॉस्कोला पोहोचले. पाच वर्षानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. तेथे त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी आर्थिक सहकार्य आणि युक्रेनसह विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. रशियाला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पोशाख परिधान केलेल्या एका तरुण रशियन मुलीची नृत्य होती, जी इतरांसोबत नृत्यात सामील झाली होती. सणासुदीच्या वेळी परिधान केले जाणारे पिवळ्या आणि लाल रंगाचा लेहेंगा-चोली एका चिमुकलीने परिधान केला होता आणि ती आनंदाने नाचत होते. व्हिडिओमधील तिच्या मनमोहक नृत्याने संपूर्ण सोशल मीडियावर मन जिंकले आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा