पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर इंधन दरवाढ होईल अशी शक्यता आहे. कारण रशिया युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून काढून टाकले आहे. यामुळे रशियाला इतर देशांसोबत व्यवसाय करणे कठीण झाले आहे. त्यामुळे निवडणुकांचा निकाल जाहीर होताच इंधन १५ ते २० रुपयांनी वाढेल अशी चर्चा सुरु आहे. भारताची इंधनाची गरज भागवण्यासाठी जवळपास ८४ टक्के खनिज तेल आपण आयात करतो. भारत रशियाच्या सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी रोसनेफ्टकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, जेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर आले होते. तेव्हा रोझनेफ्ट आणि इंडिया ऑइल कॉर्पोरेशनने २०२२ च्या अखेरीस नोव्होरोसियस्क बंदरातून भारताला २० दशलक्ष टन तेल पुरवठा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. भारत तेलखरेदीसाठी मध्यपूर्वेकडील देशांवर अवलंबून आहे. आयातीत वैविध्य आणण्यासाठी अमेरिका आणि रशियासारख्या देशांकडून तेल खरेदी वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशांतर्गत पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाक इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या भावाशी निगडित असतात. त्यामुळे येत्या दिवसात सरकार काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागून आहे. असं असताना निर्बंधांमुळे अडचणीत आलेल्या रशियन तेल कंपन्या भारताला तेलावर भरघोस सूट देत आहेत. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, रशियन तेल कंपन्या भारताला क्रूडच्या किमतीवर २५ ते २७ टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. जर हा प्रस्ताव भारताने स्वीकारला तर पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होतील.

आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून काढल्यानंतर या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी रशियन सरकार नवीन पेमेंट सिस्टम तयार करण्यात गुंतले आहे. तसे झाले तरच रशियाचा भारतासोबतचा तेल व्यापार वाढू शकेल. रशियन कंपन्यांकडून मोठ्या सवलतीचे संकेत मिळाले असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे. “ऑफर आकर्षक आहे. पण तेलखरेदी कशी करणार, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही.”, असं सूत्रांनी सांगितलं.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”
Putin Ukraine hating Donald Trump victory hit Europe How long will Ukraine stand strong in front of Russia
पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे

UP Assembly Election Results 2022 Live: सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची जबरदस्त आघाडी, १०० हून अधिक जागांवर पुढे

तेलाचे भाव डिसेंबरपासून वाढत आहेत, पण उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे जवळपास चार महिने पेट्रोल-डिझेल दरवाढ रोखून धरण्यात आली होती. आता निवडणुका संपल्यामुळे ती कोणत्याही क्षणी होऊ शकेल, असा अंदाज आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीत या इंधनांवर विविध कर वा शुल्क कमी करण्याची शक्यता नाही. दुसरीकडे निर्बंधांदरम्यान रशियाशी व्यापार सुरू करण्यापूर्वी भारताने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. युक्रेनवरील हल्ल्याच्या दरम्यान रशियाकडून तेल खरेदी केल्याने अनेक देशांचा राग ओढावून घ्यावा लागेल.

Assembly Election Results 2022 Live: पंजाबमध्ये आप ४३ जागांवर पुढे; तर, गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसची आघाडी

पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. जर भारताने रशियन कंपन्यांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारला तर पेट्रोलच्या किंमती जैसे थे किंवा त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.