काही लोक फारच करामती असतात. ते काय करतील याचा नेम नाही. ज्या गोष्टींचा आपण विचारही करु शकत नाही अशी गोष्ट करण्याचे खुळ त्यांच्या डोक्यात असतं. मग या खुळापायी जीव धोक्यात घालायलाही ते मागेपुढे पाहत नाही. रशियाची झिओ त्यातलीच एक. सर्कसमध्ये ती स्टंटवूमन म्हणून काम करते, म्हणजे रिस्क घेणं तिच्या रक्तातच. आता तिने सगळ्यांनाच आपल्या स्टंटने थक्क करून सोडलं आहे. चालत्या पंख्याची पाती आपल्या जीभेने रोखून तिने नवा विक्रम केला आहे.
जिथे फिरत्या पंख्याला हाताने रोखण्याचे धाडस देखील कोणी करणार नाही तिथे ती आपल्या जिभेने फिरत्या पंख्याचे पाते थांबवून दाखवते. तिची ही करामत पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो पण ती मात्र बिंधास्त हे स्टंट करते. काही मिनिटांत पंख्याचे पाते रोखून दाखवण्याचा विश्वविक्रम तिच्या नावावर आहे. आपला हा विक्रम तिने दोनदा मोडला आहे. गेल्यावेळी १ मिनिटात २० वेळा पंख्याचे पाते तिने रोखून दाखवलं होतं हाच विक्रम तिने मोडला आहे. यावेळी एका मिनिटांत तिने ३२ वेळा पंख्याचे पात जिभेने रोखून दाखवलं आहे.