Russian Woman’s Travels in Mumbai Local Train: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबईच्या लोकलची ओळख आहे. या लोकलमुळेच मुंबईकर आपला प्रवास वेगानं करू शकतात. दररोज लाखो प्रवासी या लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडीओ प्रचंड गर्दी, डान्स, गाणं, हाणामारी यांचं मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडीओ समोर येतच असतात. परंतु, आता रशियामधील एका प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगरनं मुंबई लोकल ट्रेनमधील अनोखा व्हिडीओ शेअर केला आहे. या रशियन तरुणीनं मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती नेमकं काय बोलली ते जाणून घेऊया…

सध्या एका रशियन तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मेरी चुगुरोवा या नावाच्या रशियन महिला ब्लॉगर व एक व्हिडीओ क्रिएटर असलेल्या तरुणीनं तिचा मुंबईच्या लोकल ट्रेनमधील प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई लोकल ही देशातील सर्वाधिक गर्दीच्या ट्रेनपैकी एक मानली जाते. ट्रेनच्या जनरल डब्यातील तिच्या प्रवासाचे दोन व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तिनं शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये ती माहीम रेल्वेस्थानकाबाहेर दिसत आहे. मात्र, दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती ट्रेनमध्ये लोकल प्रवाशांशी बोलताना दिसत आहे. ती काही जणांशी इंग्रजीत, तर काही जणांशी हिंदीत बोलताना दिसत आहे. प्रत्येकानं तिच्याशी आपुलकीनं संवाद साधत माहिती दिली आहे.

(हे ही वाचा : …म्हणून कुणालाच कमी समजू नका! बिबट्यानं हल्ला चढवताच इवल्याशा बदकाने लढवली अशी शक्कल की, VIDEO पाहून कौतुक कराल )

एका क्लिपच्या कॅप्शनमध्ये ती लिहिते, “लोकल ट्रेनमध्ये रशियन कुडी भारतीयांशी बोलत आहे.” कौतुक करताना तिने असेही सांगितले, “ट्रेनमध्ये महिलांसाठी वेगळा डबा आहे; पण त्या डब्यात न जाता तिनं जनरल डब्यातून प्रवास केला आणि काही प्रवाशांशी संवाद साधला. ट्रेनमधून उतरल्यानंतर मुंबई लोकल ट्रेनचा अनुभव चांगला होता.” ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेबद्दल तिने भारतीय रेल्वेचेही आभार मानत, लोकल ट्रेनचे भरभरुन कौतुक केले आहे.

मेरी म्हणते की, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका ट्रेनमधून एकाच वेळी हजारो लोक प्रवास करतात असं तिनं ऐकलं होतं अन् मग तिची उत्सुकता जागी झाली. तिनं सरळ मुंबई गाठलं. पण इथे आल्यानंतर तिला भलताच अनुभव आला. मुंबईकरांनी अत्यंत प्रेमानं तिच्याशी संवाद साधला. तिला बसण्यासाठी जागा दिली. एवढंच नाही, तर तिनं दरवाजावर लटकूनसुद्धा प्रवास केला. पण, दररोज असलेली लोकलची गर्दी तिला त्या दिवशी मात्र दिसली नाही. या लोकल ट्रेनमधून घेतलेला असा अनुभव तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

चुगुरोवा हिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर केल्यापासून तो १.१ दशलक्षापेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि ७७,००० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शेकडो युजरनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.