भारतात पर्यटनासाठी आलेल्या रशियन पर्यटकाच्या एटीएमचा पीन लॉक झाल्याने, मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ त्याच्यावर आली. खर्चासाठी पैसे नसल्याने हा रशियन तरुण कांचीपुरम येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागत होता. ही गोष्ट ट्विटच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना समजताच तरुणाच्या मदतीसाठी त्या देवासारख्या धावून आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : तिची तहान अनेकांच्या जीवावर बेतली असती

इवेन्जलिन हा रशियन तरुण भारत भ्रमंतीसाठी आला होता. पण भारतात आल्यानंतर त्याच्या एटीएमचा पीन लॉक झाला. खर्चासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. पीन लॉक झाल्याने त्याला पैसेही काढता येईना. शेवटी अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्याने कांचीपुरम येथील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या बाहेर भीक मागायचं ठरवलं. मंदिराबाहेर विदेशी पर्यटक भीक मागत असल्याचे पाहून स्थानिकांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ सर्व कागदपत्रं होती पण आर्थिक अडचणींमुळे भीक मागत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं.

वाचा : अखेर ‘त्या’ जाहिरातीसाठी डव्हने मागितली माफी

अनेकांनी ट्विट करत या तरूणाच्या अडचणीकडे स्वराज यांचं लक्ष वेधून घेतलं. स्वराज त्याच्या मदतीला धावून आल्यात. ”रशिया हा आमचा जुना मित्र आहे. चेन्नईमधील अधिकारी तुला सर्वोतोपरी मदत करतील’ असं ट्विट करत स्वराज यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. इवेन्जलिन २४ सप्टेंबरला भारतात आला होता.