साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, ज्याला पाहून कोणालाही त्याची भिती वाटेल. तुम्ही मार्केटमध्ये शॉपिंग करता करता अचानक तुमच्या पायाशी साप आढळला तर? या विचारानेच घाबरगुंडी उडेल. जर कल्पना करून तुमची अशी अवस्था झाली तर प्रत्यक्षात काय होईल? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खरेदीमध्ये गुंतलेल्या या व्यक्तीच्या जवळ एक साप सरपटत जवळ येताना पाहून त्याला घाम फुटला. हा व्हिडीओ पाहून काही वेळासाठी तुम्ही घाबरून जाल हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती हातात काही सामान पकडून मार्केटमधल्या फ्रीजमधून स्वतःसाठी काही पेय घेताना दिसून येत आहे. त्याचवेळी तिथल्या फ्रिजच्या बाजुने एक काळ्या रंगाचा साप सरपटत या व्यक्तीच्या जवळ येताना दिसून येत आहे. खरेदीमध्ये गुंतलेल्या या व्यक्तीला आपल्या बाजुला इतका भयानक साप आहे, याची कल्पना सुद्धा आली नाही. पण ज्यावेळी हा साप त्याच्या पायाजवळ आला त्यानंतर या व्यक्तीला साप दिसला. त्यानंतर त्याची जी अवस्था झाली ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. आपल्या पायाजवळ साप असल्याचं पाहून भीतीने या व्यक्तीने आपल्या हातातलं सर्व सामान जागीच फेकून तिथून पळून जाण्याचा पर्याय स्वीकारला. हा साप त्याच्या पायाच्या अगदी जवळ आला होता.
आणखी वाचा : अरे बापरे! सिंहाला कडेवर घेत फिरत होती महिला; VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!
सापाला पाहून हा व्यक्ती दूर पळून एका कोपऱ्यात जाऊन लपतो. त्यानंतर हा साप आहे त्याच जागी थांबलेला पाहून या व्यक्ती काहीसा गोंधळात पडतो. हा साप एकाच जागी कसा काय थांबला? हे पाहून व्यक्ती सापाजवळ अगदी घाबरत घाबरत हलक्या पावलांनी त्याच्या जवळ जाऊन पाहू लागतो. सापाच्या जवळ आल्यानंतर या व्यक्तीने जे केलं ते पाहून तुम्हाला सुरूवातीला आश्चर्य वाटेल. या व्यक्तीने सापाला आपल्या हातात पकडत आपल्या पायावर दोन्ही हातांनी दुमडलं. ज्या सापाला हा व्यक्ती घाबरला त्याला नंतर त्याने हाताने पकडत दुमडलं, हे पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आणखी वाचा : गुड बॉय! हा चिमुकला सकाळी ६ वाजता उठून स्वतःची कामं करतो आणि स्वयंपाक सुद्धा करतो…, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘योद्धा जन्माला येत नाही तर…तो घडत असतो!’ भारतीय जवानाचा हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणाल!
खरं तर हा व्हिडीओ एक प्रॅंक व्हिडीओ असून तो official_viralclips नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरणं कठीण झालं. साप पाहिल्यानंतर या व्यक्ती जी झालेली अवस्था पाहून लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतक आवडला की आतापर्यंत या व्हिडीओला केवळ एका दिवसांत १३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.