पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा वाद आता वाढत चालला आहे. एकीकडे यंत्रणांनी तपास तीव्र केला असताना दुसरीकडे सचिनच्या शेजाऱ्यांनी आता सीमाचा विरोध सुरू केला आहे. आमच्या मुलांवर वाईट परिणाम होईल, असे म्हणत सीमाला विरोध करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. उद्या प्रत्येकजण पाकिस्तानातून बायको आणतील, त्यामुळे तिला पाकिस्तानात पुन्हा पाठवा अशी मागणी या महिलेने केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सचिनच्या शेजारी असलेल्या महिलेच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सीमा हैदरने पाकिस्तानात परत जावे असे महिलेचे म्हणणे आहे. अशा प्रकारे आपली नवीन पिढी बिघडते. मग सगळे म्हणतील की आम्ही पाकिस्तानातूनच सून आणू. सचिन म्हणजे काय, त्याला नीट कसे बोलावे हेही कळत नाही. ती या मुलाच्या प्रेमात कशी पडते? असा संशय या महिलेने व्यक्त केला आहे.

महिलेने सीमावर संशय व्यक्त केला

ती महिला म्हणाली, “सीमा म्हणते की ती पाचवी पास आहे आणि ती अस्खलित इंग्रजी बोलते आणि कम्प्यूटर देखील चालवते. प्रत्येकी चार पासपोर्टसह तीन देश पार करून ती भारतात आली आहे. हे एका अशिक्षित महिलेला कंस शक्य झालं, असाही ती सवाल करते. ही महिला सचिनची शेजारी असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी सीमाला परत पाठवण्यासाठी सचिनच्या गावात निदर्शनेही सुरू झाली आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: “हा पाकिस्तान नाही भारत आहे” सीमा हैदरचा बंद खोलीतील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले

सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सीमा हैदर काही वाईट हेतूने भारतात आल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. इतकंच नाही तर काहींनी सीमाला पाकिस्तानी गुप्तहेरही म्हटलं आहे. त्याशिवाय, सीमा हैदर पाकिस्तानी लष्करातील मेजर सामिया रहमान असल्याचंही म्हटलं जात आहे. 

Story img Loader