-अंकिता देशकर

Why Arjun Tendulkar Selected In IPL 2023: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएल २०२३ मधील, रविवारी झालेला सामना, तेंडुलकर कुटुंबियांसाठी खास होता. सचिनचा मुलगा अर्जुन याने या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. अनेक माध्यमातून अर्जुनावर कौतुकाचा वर्षाव होत असताना काही टीकाकारांनी मात्र त्याच्यानिवडीवर प्रश्न केला आहे. काहींनी तो ब्राम्हण असल्याने व सचिनच्या वशिल्याने संघात खेळू लागला इतके आरोप लगावले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर घराणेशाहीच्या चर्चेने धुमाकूळ घातला अर्जुन तेंडुलकरची निवड ३२३ चेंडूंमध्ये १००९ धावा करणाऱ्या प्रणव धनावडे याच्यावर अन्याय करून करण्यात आली असल्याची एक जुनी पोस्ट आता पुन्हा व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. नेमका हा प्रकार काय होता हे पाहूया…

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!

काय होत आहे व्हायरल?

द इंडियन एक्सप्रेसला व्हायरल दावा ट्विटरसह सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचे लक्षात आले.

तपास:

द इंडियन एक्सप्रेस ने गूगल किवर्ड सर्च वापरून व्हायरल दाव्याचा तपास केला. यात आम्हाला प्रणव धनावडे आणि अर्जुन तेंडुलकर या दोघांच्या निवडीबाबत अनेक न्यूज रिपोर्ट्स आढळले.

इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमी प्रमाणे, धनावडेने ३२३ चेंडूत १००९ धावा केल्या ज्याने क्रिकेटच्या कल्पनाशक्तीला नवीन क्षितिजापर्यंत पोहोचवले. बातमीचे शीर्षक होते: Untold story of Pranav Dhanawade’s 1000 runs record: 25 chances, 10-year-old ‘pacers’, 30-yard boundaries हि बातमी ३१ मे २०१६ रोजी प्रकाशित झाली होती.

१००९ धावा केल्यावर सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी यांनी देखील प्रणवचे अभिनंदन केले होते.

आम्हाला फर्स्टपोस्ट मध्ये देखील एक बातमी सापडली, ज्याचे शीर्षक होते, “Why Arjun Tendulkar, not Pranav Dhanawade was selected in the U-16 West Zone side”

https://www.firstpost.com/sports/why-arjun-tendulkar-not-pranav-dhanawade-was-selected-in-the-u-16-west-zone-side-2809772.html

रिपोर्ट मध्ये म्हंटले होते: मुंबईच्या अंडर-१६ संघाची निवड प्रणवच्या विक्रमाच्या आधी झाली. त्यांनी काही सामनेही खेळले होते. त्यामुळे प्रणव मुंबई अंडर-१६ संघासाठी खेळला नसल्यामुळे तो पश्चिम विभागाचा भाग होऊ शकत नाही, हीच प्रक्रिया आहे,” प्रणवचे वडील प्रशांत धनावडे यांनी फर्स्टपोस्टला सांगितले.

आम्हाला टाइम्स ऑफ इंडिया मध्ये देखील एक रिपोर्ट सापडला, ज्याचे शीर्षक होते, ‘Pranav Dhanawade to pursue English dreams’ हि बातमी ९ एप्रिल २०२२ ला प्रकाशित झाली होती रिपोर्ट मध्ये म्हंटले होते प्रणव ला Northwich Cricket Club, Cheshire, Manchester मध्ये खेळण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

https://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/news/pranav-dhanawade-to-pursue-english-dreams/articleshow/90741217.cms

आम्हाला लोकसत्ता च्या फेसबुक पेज वर अपलोड केलेला एक व्हिडिओ देखील सापडला, जिथे प्रणवने स्वतः हा दावा फेटाळला होता. या मुलाखतीत म्हंटले कि व्हायरल दावा खोटा आहे. “माझी आणि अर्जुनची बरोबरी नाही होऊ शकत. अर्जुन वेस्ट झोनच्या टीम मध्ये सिलेक्ट झाला होता. जे लोकं स्टेट खेळतात त्यांचे सिलेक्शन होते. त्यावेळी अर्जुन अंडर-१६ खेळला होता त्यानुसार तो वेस्ट झोनच्या टीम मध्ये आलेला. मी तेव्हा अंडर-१६ स्टेट च्या मॅचेस खेळलो नव्हतो. मी त्या निकषांमध्ये बसत नव्हतो. लोकांना अफवा पसरवण्यासाठी एक कारण पाहिजे असतं अजून काही नाही. मी त्या वेळी देखील माझ्या सोशल मीडिया वर या दाव्याचे खंडन केले होते. अर्जुन माझा एक चांगला मित्र आहे.”

हा इंटरव्यू तुम्ही लोकसत्ता च्या फेसबुक पेज वर बघू शकता, जो ८ जानेवारी, २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आला होता.

हे ही वाचा<< अर्जुन तेंडुलकरच्या IPL पदार्पणावर सचिनची ‘बाप’ प्रतिक्रिया वाचून डोळे पाणावतील! म्हणाला, “जर तू खेळाला आदर…”

या विषयावरील अधिक माहितीसाठी आम्ही क्रीडा पत्रकार आणि लेखक, विजय लोकपल्ली यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी भारतातील क्रिकेटशी संबंधित पाच पुस्तके लिहिली आहेत. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना ते म्हणाले, “हा निव्वळ हास्यास्पद दावा आहे. त्याची खेळी शाळकरी मुलांच्या विरुद्ध आली होती. प्रणवला मुंबई क्रिकेट असोसिएशनने चांगली शिष्यवृत्ती देखील दिली होती. एखाद्या सेलिब्रिटीच्या मुलाला लक्ष्य बनवणे अयोग्य आहे. अर्जुन आणि प्रणव यांची तुलना नाही आणि माझ्या ४० वर्षांच्या क्रिकेट पत्रकारितेत मला जातीच्या आधारावर भेदभावाची एकही घटना समोर दिसली नाही.”

निष्कर्ष: अर्जुन तेंडुलकरची निवड घराणेशाहीमुळे झालेली नाही आणि प्रणव धनावडेवर अन्याय झाल्याचे दावे करणारे सोशल मीडिया पोस्ट्स खोटे आहेत.

Story img Loader