संपूर्ण क्रिकेट विश्वात धावांचा पाऊस पाडून चाहत्यांच्या गळ्यातील ताईल बनलेल्या सचिन रमेश तेंडुलकरला ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणून ओळखलं जातं. क्रिकेटच्या मैदानात भल्या भल्या गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा सचिन आजही चाहत्यांच्या हृदयात कायम आहे. एकेकाळी सचिन…सचिन… असा गजर मैदानात वाजायचा आणि चौकार षटकारांची आतषबाजी व्हायची. पण सचिन आता क्रिकेटच्या मैदानातून जरी बाहेर गेला असला, तरी चाहत्यांच्या मनातील सचिन अजूनही मैदानावरच आहे. कारण सचिनच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा ‘सचिन सचिन’ नावाचा नारा लावला. पण तो मैदानात नाही तर चक्क एका विमानात. अवघ्या १६ व्या वर्षी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करुन क्रिकेटच्या मैदानात २०१३ पर्यंत धावांचा पाऊस पाडला. असं व्यक्तीमत्व असणाऱ्या सचिनच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन एका विमानातून प्रवास करत असताना चाहत्यांनी पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव केला. सचिन…सचिन.. अशी साद दिल्यानं जणू काही आपण क्रिकेटच्या मैदानावरच आहोत, असं चाहत्यांनाही वाटलं असावं. पण विमान प्रवासात सीटबेल्ट लावल्यानं सचिनला त्याच्या चाहत्यांना तातडीनं प्रतिसाद देता आला नाही. परंतु, सचिनने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांची प्रेमभावना समजून त्यांचे आभार मानले आहेत. सचिन ट्विटरवर म्हणाला, “विमान प्रवासात प्रेमाने माझं नाव घेणाऱ्या त्या सर्वांचे आभार. जेव्हा मी फलंदाजी करायलो जात होतो, तेव्हाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दुर्देवाने, मी तुम्हाला विमानात शुभेच्छा देऊ शकलो नाही. कारण सीटबेल्ट लावण्यात आला होता. पण आता मी तुम्हाला मोठा नमस्कार करतो आहे.”

नक्की वाचा – Video : आरारारारा खतरनाक! मेस्सीच्या चाहत्यांनी केरळच्या अरबी समुद्रात मारली डुबकी, १०० फूट खोल पाण्यात कटआऊट लावला

इथे पाहा व्हिडीओ

सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर नऊ वर्षे झाली, पण अजूनही सचिनच्या नावावर मोठे विक्रम आहेत. शतकांचं शतक म्हणजे १०० शतक ठोकण्याचा विक्रम अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. यामध्ये ५१ कसोटी क्रिकेट तर ४९ एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४३५७ धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या क्रमवारीतही सचिनंच अव्वल स्थानी आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये १५९२१ धावा कुटल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८४२६ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar fans viral video chants sachin sachin in a flight god of cricket reacts on twitter nss