Sachin Tendulkar Reacts To Maldives Vs Lakshadweep Controversy: एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकणारे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेक भारतीयांनी आपल्या मालदीवच्या ट्रिपचे प्लॅन्स रद्द केले आहेत आणि लक्षद्वीपकडे अनेकांची पाऊले वळत आहेत. अशातच आता सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय समुद्र किनाऱ्यांच्या तोडीस तोड अशा महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो शेअर केले आहेत. सचिन आपला ५० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कोकणात भोगवे बीचवर गेला होता त्यावेळेचे हे फोटो व व्हिडीओ पुन्हा शेअर करताना त्याने महाराष्ट्रातील निसर्गाचे व कोकणातील आदरातिथ्याचे भरभरून कौतुक केले आहे.

मालदीव वि. लक्षद्वीप वादात काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

“आम्ही माझा ५०वा वाढदिवस सिंधुदुर्गात साजरा केलेल्या क्षणाला आता २५० दिवस झाले! किनारपट्टीवरील या सुंदर शहराने आम्हाला हवं असलेलं सर्व काही आणि त्याहुनही बरंच काही देऊ केलं. अप्रतिम आदरातिथ्यासह सुंदर ठिकाणे आमच्यासाठी आठवणींचा खजिना निर्माण करून गेली आहेत. भारताला सुंदर किनारपट्टी आणि प्राचीन बेटांचा आशीर्वाद आहे. आपले “अतिथी देवो भव” म्हणणारे संस्कार जगभरात प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे अजून न पाहिलेल्या न अनुभवलेल्या अनेक निसर्गाच्या कलाकृती आहेत. ही ठिकाणे अनेक आठवणी निर्माण होण्याची वाट पाहत आहेत. #ExploreIndianIslands,” सचिनने X (पूर्वी Twitter म्हणून ओळखले जाणारे) पोस्ट केले.

दरम्यान, मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर मालदीव विरुद्ध लक्षद्वीप हा वाद निर्माण झाला आहे. या मंत्र्याने पोस्ट करत भारताने देशाला (मालदीवला) लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे आणि समुद्रकिनारी पर्यटनात मालदीवशी स्पर्धा करताना भारताला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. म्हणून हा प्रयत्न असल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केले आहे. मालदीवच्या मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून सचिनची ही प्रतिक्रिया सुद्धा चर्चेत आली आहे.

वाद सुरू झाल्यापासून, सोशल मीडियावर अनेक भारतीयांनी दावा केला आहे की त्यांनी मालदीवच्या सहली रद्द केल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या रद्द केलेल्या विमान प्रवासाचे आणि हॉटेल बुकिंगचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. याशिवाय ‘#BoycottMaldives’ हा भारतातील X वरच्या टॉप ट्रेंडपैकी एक आहे.

हे ही वाचा<< १ रुपयाची काडेपेटी तयार कशी होते? सेकंदात आयुष्य संपतं पण बनायला लागणारे कष्ट पाहून व्हाल थक्क

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक तणाव काही महिन्यांतच वाढला आहे, नवीन अध्यक्षांनी परराष्ट्र धोरणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत, चीनशी घनिष्ठ संबंध आणि पूर्वीच्या भारताला पाठिंबा देण्याच्या धोरणाला बाजूला सारण्याचे संकेत दिले आहेत.

Story img Loader