Sachin Tendulkar Tweet On Shubman Gills Birthday Viral : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शुबमन गिल मागील काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडत आहे. धडाकेबाज फलंदाजी आणि सुंदर लूकमुळे तरुण मुलींचा गिलवर क्रश असल्याचं अनेकदा स्टेडियममध्ये पाहायला मिळालं आहे. ‘आय लव्ह यू’ गिल असे पोस्टर हातात घेत काही मुलींनी अप्रत्यक्षरित्या गिलला स्टेडियममध्ये प्रपोजही केल्याचं समोर आलं आहे. मात्र, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगतात.

पण या दोघांमधील नात्याबाबत आजपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. अशातच ८ सप्टेंबरला गिलचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गिलच्या वाढदिवसानिमित्त भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मात्र, सचिनने शुबमनला दिलेल्या शुभेच्छा इंटरनेटवर झळकताच नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्सचा वर्षाव केला आहे. शुबमन आणि सारा यांच्या नात्याबाबत मजेशीर प्रतिक्रियांचा भडीमारच केला आहे.

ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Jitendra Awhad
Jitendra Awhad : “ताजमधले केक अन् चांगली कॉफी…” विधानसभेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करताना आव्हाडांची खास मागणी चर्चेत

इथे पाहा सचिन तेंडुलकरचं ट्वीट

सचिनने ट्वीटरवर शुबमनच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत म्हटलंय, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. पुढील वर्षांत धावांचा पाऊस पडो आणि इतिहास रचण्याची संधी मिळो. सचिनच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी मेजशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं, साराच्या खऱ्या अकाऊंटवरून पोस्ट करा. काही नेटकऱ्यांनी शुबमन आणि साराच्या लग्नाबाबतही प्रतिक्रिया दिल्या आहेत. सारा आणि शुबमनच्या नातेसंबंधांबाबत चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे, असंच या व्हायरल झालेल्या मिम्सवरून स्पष्ट होत आहे.

सचिनच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केला भन्नाट मिम्सचा वर्षाव

Story img Loader