Sacred Games Actress Stripping: इराण मधील ज्वलंत हिजाब युद्धात जगभरातील महिलांनी सहभाग घेतला आहे. इराणी तरुणी महसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर महिना उलटून गेला तरीही सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. हिजाब नीट परिधान न केल्याने संस्कृती रक्षक पोलिसांनी अमिनीला अटक केली होती. यानंतर ती कोमात गेली व तिचा मृत्यू झाला. महसा अमिनी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ सेक्रेड गेम्स मधील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ‘माय बॉडी माय चॉईस’ असे म्हणत अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपले कपडे उतरवले आहेत.
नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्समधील अभिनेत्री एलनाझ नोरुझी हिचा मूळ जन्म इराणचा आहे. सध्या इराणच्या संस्कृती रक्षक पोलिसांच्या विरुद्ध सुरु असणाऱ्या आंदोलनात एलनाझने सुद्धा सहभाग घेतला आहे. महिलांना आपल्या मर्जीचे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी एलनाझने अगदीच हटके स्वरूपात बंड पुकारले आहे. एलनाझने आपल्या इंस्टाग्रामवर स्ट्रीप करून म्हणजेच आपले कपडे उतरवत फोल संस्कृतीरक्षक पोलिसांचा निषेध केला आहे.
एलनाझने कॅप्शन देत म्हंटले की “जगभरातील कोणतीही स्त्री, मग ती कुठे राहणारी असो कोणत्याही धर्माची असो तिला तिच्या पसंतीचे कपडे घालता यायला हवेत. कोणताही अन्य पुरुष किंवा स्त्री सुद्धा तिला अडवू शकणार नाही असे वातावरण असायला हवे. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल तरी आपण आदर ठेवायला हवा. लोकशाही म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता.. प्रत्येक स्त्रीला सुद्धा स्वतःचे निर्णय घेता यायला हवेत. ” यातच पुढे एलनाझ म्हणते की, मी नग्नता नव्हे तर स्वातंत्र्याला प्रोत्साहन देत आहे. एलनाझ नोरुझी हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर १० वर्ष मॉडेलिंग केले आहे. ती भारतात कत्थकचे प्रशिक्षण घेत आहे.
सेक्रेड गेमच्या अभिनेत्रीने कपडे उतरवून केला बंड
विश्लेषण: रस्त्यावर उतरून महिलांनी स्वतःचे केस कापले, हिजाब जाळले; इराणमध्ये नेमकं घडतंय काय?
संस्कृती रक्षकांच्या मारहाणीत अमिनीने गमावला जीव?
कट्टर पुरूषप्रधान अशा या संस्कृतीरक्षक गटाने २२ वर्षीय कुर्दिश तरुणीला अटक केल्यावर तिला समजावण्यापेक्षा मारहाण केली असावी असा आरोप या तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे. अमिनीच्या डोक्याच्या सीटी स्कॅनमध्ये हाड फ्रॅक्चर, रक्तस्त्राव आणि मेंदूला सूज आल्याचे आढळले होते, यावरूनच तिच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कुटूंबियांचे म्हणणे आहे