Poor girl video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिस्थिती सगळं काही शिकवते असं म्हणतात, त्यात गरिबी वाट्याला आली की जगणं खूपच अवघड होऊन जातं. अशा वेळी गरीब लहान मुलांना नको ते काम करण्यास भाग पाडलं जातं. अनेक दिवस-रात्र ही मुलं उपाशीच असतात. मग पोटात अन्नाचा कण जाण्यासाठी सगळीकडेच अन्न शोधू लागतात. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक लहान मुलगी दुसऱ्यांनी टाकलेल्या खरकट्या ताटातून आपली भूक भागवतेय.

हेही वाचा… एकीकडे कर्तव्य एकीकडे प्रेम! “लवकर घरी ये…”, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

अन्नासाठी करतेय धडपड

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत एका ठिकाणी कार्यक्रमामध्ये सगळे जेवणाचा आस्वाद घेताना दिसतायत. जेवण झाल्यावर अनेक जण एका भांड्यात त्यांची खरकटी जेवणाची ताटं जमा करताना दिसतायत. त्याच ताटातलं उष्ट जेवणं एक लहान मुलगी खाताना दिसतेय.

साधे कपडे, अंगाला माती लागलेली आणि पोटाची भूक भागवण्यासाठी ती चिमुकली त्या भांड्यात जेवण शोधताना दिसतेय. आपल्या हातात जेवण जमा करून ती आपल्या पोटाची खळगी भरतेय. एवढं सगळं समोर घडतानादेखील तिथे जमलेल्या एका माणसानेसुद्धा तिला खरकटं अन्न खाण्यापासून थांबवलं नाही आणि तिला एक नवीन जेवणाचं ताट देऊ केलं नाही.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @official_vishwa_96k या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “माझे नशीब खराब आहे म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहा”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लाज वाटली पाहिजे त्या लोकांना, जे त्या बाळासमोर खरकटे ताट टाकत आहेत, माणुसकी विसरलेत लोक.” तर दुसऱ्याने “अन्न हेच सर्वस्व आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “लाईक वाढवण्यासाठी तू व्हिडीओ काढतोय, जर तू ताईला खाऊ घातलं असतं तर सगळ्यांना व्हिडीओ आवडला असता.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sad video of girl eating from waste food from plates poor girl viral video on social media dvr