How To Manifest: योगी गुरु व अभ्यासक सद्गुरू यांचे सोशल मीडियावर १ कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. सद्गुरू आपल्या सोशल मीडिया चॅनेलच्या माध्यमातून अनेकदा मानसिक, शारीरिक व आध्यत्मिक उन्नत्तीसाठी काय करता येईल याचा मार्ग दाखवत असतात. त्यांच्या असंख्य बहुचर्चित व्हिडीओजपैकी एक खास व्हिडीओ सध्या लक्षवेधी ठरत आहे. याचे कारण म्हणजे या व्हिडिओचा विषय सुद्धा प्रत्येकाच्या मनाला भावणारा व त्यातून समोर आलेला प्रश्न सुद्धा प्रत्येकाला पडणारा आहे. आणि तो म्हणजे मॅनिफेस्ट कसे करावे?
सर्वात आधी हे जाणून घेऊया की मॅनिफेस्ट करणे म्हणजे काय? तर ज्या प्रमाणे आपण एखाद्या गोष्टीसाठी देवाकडे किंवा आपल्याला ज्या शक्तीवर विश्वास आहे त्याकडे प्रार्थना करतो त्याचप्रमाणे या निसर्गाला आपल्याला हव्या तशा गोष्टी घडण्यासाठी व आपल्या मनाला त्या घडवण्यासाठी प्रार्थना करणे म्हणजे मॅनिफेस्ट करणे म्हणतात.
सद्गुरू म्हणतात की, तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडावी असे वाटत असेल तर तुम्हाला आधी तुमच्या मनाला ती गोष्ट कशी चांगली व योग्य आहे हे पटवायला लागेल. अलीकडे कोणतेही काम पूर्णत्वाला नेताना अडचणी येतात कारण आपल्याकडे अनेक आरंभशूर आहेत. सुरुवात कितीही दणक्यात केली तरी तुमचे मन व लक्ष विचलित होऊ देता कामा नये. कारण आपले मन जर दुसऱ्या सेकंदाला बदलत असेल तर तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींचेही पर्याय शोधू लागाल व त्यामुळे सध्या ज्या मार्गावरून तुम्ही ध्येयाकडे वाटचाल करत आहात त्यात तुम्हाला अडथळे दिसू लागतील. त्यामुळे सर्वात आधी काय हवं आहे व का हवं आहे हे ठरवावे.
Video: सद्गुरूंनी दिलेला कानमंत्र ऐका
याशिवाय तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात त्या गोष्टीचा हेतू हा देखील शुद्ध असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला मानसिक बळ लाभून तुम्ही अधिक नेटाने ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला समर्पित करता तेव्हा तुमचे मन, विचार, कृती यांचा ताळमेळ बसतो. तुम्ही हे शक्य आहे की अशक्य यापेक्षा ते कसा करता येईल याचा अधिक विचार करू लागता आणि हीच खरी सुरुवात आहे.
हे ही वाचा<< एसटीच्या बसमध्ये आलेला अनुभव सांगत पुणेरी काकांचे पत्र; महामंडळाकडूनही आलं खास उत्तर
तुम्हीही अशा प्रकारे तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी मॅनिफेस्ट करून म्हणजेच प्रार्थना करत असाल तर तुमचा अनुभव कसा आहे हे कमेंट करून कळवायला विसरू नका .
(वरील लेख हा प्राप्त माहिती व संबंधित व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. यातून कोणत्याही प्रकारचा दावा करण्याचा लोकसत्ताच्या हेतू नाही)