Sadhguru Feet Photo Viral As Selling at Price of 3200 Rupees : ईशा फाउंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू सध्या चर्चेत आहेत. मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली त्यांच्या संस्थेविरोधातील याचिका, त्यावर न्यायमूर्तींनी केलेली टिप्पणी, त्यानंतर संस्थेच्या कार्यालयावरील केंद्रीय संस्थांची छापेमारी या सर्व गोष्टींमुळे ईशा फाउंडेशन ही संस्था चर्चेचा विषय बनली आहे. अशातच आता आणखी एका कारणामुळे ही संस्था चर्चेत आली आहे. ईशा फाउंडेशनचं एक ई-कॉमर्स संकेतस्थळ (ऑनलाईन स्टोर) देखील आहे. या संकेतस्थळावरून ही संस्था कपडे, छायाचित्रे, रुद्राक्ष, तांब्याची भांडी, आयुर्वेदिक औषधं व वेगवेगळ्या पदार्थांची विक्री करते. या संकेतस्थळावरून जग्गी वासुदेव यांच्या पायाचा फोटो देखील विकला जात आहे. या फोटोची किंमत ३,२०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही बाब समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ईशा फाउंडेशन व जग्गी वासुदेव यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

ईशा लाइफ ई-शॉपवर जग्गी वासुदेव यांच्या पायाच्या फोटोंच्या प्रती ३,२०० रुपयांमध्ये विकल्या जात आहेत. या फोटोची माहिती देताना संस्थेने म्हटलं आहे की “सदगुरूंचे पाय पूजनीय आहेत कारण हा गुरुच्या ऊर्जेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे”. एक फूट लांबी व दीड फुट रुंदी असलेल्या छोटाश्या फोटोसाठी ईशा लाइफ ई-शॉपद्वारे ३२०० रुपये वसूल केले जात आहेत. ईशा लाइफ ई-शॉपवरील या फोटो फ्रेमची जाहिरात नेटीझन्ससाठी च्येष्टेचा विषय बनला आहे. यावर वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा >> “ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली…”, गोष्ट नव्हे प्रत्यक्षात रंगली शर्यत; कोण जिंकले ते पाहा Viral Videoमध्ये

ईशा फाउंडेशन ट्रोल

एका युजरने ईशा लाईफ प्रॉडक्ट लिस्टिंगचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर केला आहे, त्याने म्हटलं आहे की ‘सोल टचिंग मोमेंट’. तर, दुसऱ्या युजरने म्हटलंय, “पूर्वी लोक गुरुच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद मागून दक्षिणा देत होते. मात्र, आता सद्गुरूंनी यामध्ये नाविन्य आणलं आहे. ते पायाचा फोटो विकून पैसे कमावतायत”.

हे ही वाचा >> VIDEO: “…तरच आम्ही काम करु” ऑफिसच्या दरवाजावर चिठ्ठी लावत कर्मचाऱ्यांनी बॉसला दिलं चॅलेंज; शेवटी काय झालं पाहा

समाजमाध्यमांवर मिम्स व्हायरल

आणखी एका युजरने म्हटलंय की “देशाची अर्थव्यवस्था इतकी खराब आहे की सद्गुरू पायाचा फोटो विकून पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहेत”. तर, जग्गी वासुदेव यांचे चाहते हा फोटो किती महत्त्वाचा आहे, तो फोटो घरात ठेवल्याने काय होईल याबाबतचे वेगवेगळे तर्क मांडत आहेत. एका चाहत्याने म्हटलंय की “आपण घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यासाठी आपण गुरुंच्या पायांचा फोटो घेतला आणि तो घरात ठेवला तर त्यात काय चुकीचं आहे?”