भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीची लोकप्रियता अफाट आहे. धोनीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. तो ज्या ठिकाणी जातो त्याठिकाणी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे चाहत्यांची नजर चुकवण्यासाठी त्याला अनेकदा वेगवेगळी शक्कल लढवावी लागते. आपल्या चाहत्यांची नजर चुकवण्यासाठी धोनीने आणखी एक अनोखा फार्म्युला वापरल्याचे समोर आले आहे. पत्नी साक्षीने धोनीचा अनोखा अंदाज सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Virat Kohli & Anushka Sharma visit premanand ji maharaj at vrindavan
Video : विराट कोहली सहकुटुंब पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांशी काय संवाद झाला? अनुष्का शर्मा म्हणाली, “अनेक प्रश्न…”
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
View this post on Instagram

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

साक्षीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन धोनीचा अनोख्या अंदाजातील दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये धोनी चाहत्यांपासून लपण्यासाठी एका चादरीमध्ये आपला चेहरा लपवताना दिसतो. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये धोनी शांतपणे उभा असून साक्षी धोनीच्या कुल अंदाजावर हातवारे करत प्रेम व्यक्त करताना दिसते.  यापूर्वी बॉलिवूडमधील गाण्यावरील धोनीच्या नृत्याला चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. यात धोनीने पत्नी साक्षीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला होता.

धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी सामन्यापासून तो दूर आहे. तो सध्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवताना दिसतो. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेनंतर धोनीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. टी-२० मध्ये त्याने युवा खेळाडूंना संधी द्यावी, अशा प्रतिक्रिया उमटल्या. दुसरीकडे जाणीवपूर्वक धोनीला लक्ष्य केलं जात असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटल्याचे पाहायला मिळाले.

Story img Loader