Salman Khan Threatens Lawrence Bishnoi Fact Check Video : अलीकडेच बॉलीवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या गँगने अभिनेत्याकडून पाच कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे. यामुळे आता सलमान खानच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांशी संबंधित एका व्हॉट्सॲप नंबरवर ही धमकी देण्यात आली होती. यानंतर सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईला ओपन चॅलेंज करत धमकी दिल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून आता बरीच चर्चादेखील रंगतेय. पण, सलमान खानने खरंच लॉरेन्स बिश्नोईला ओपन चॅलेंज दिल्याचा कोणता व्हिडीओ बनवला होता का? याबाबत आम्ही तपास सुरू केला तेव्हा व्हायरल व्हिडीओची एक वेगळी सत्य बाजू समोर आली, ती आपण जाणून घेऊ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर ध्रुव राठी पेरोडीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

आधी व्हिडीओ पाहून आम्ही तपास सुरू केला. व्हिडीओचे निरीक्षण करताना लिप-सिंक थोडे वेगळे दिसून आले. यावरून समजले की, हा व्हिडीओ AI टूल वापरून बनवला गेला असू शकेल.

त्यानंतर क्लिपचा नेमका मूळ स्रोत निश्चित करण्यासाठी आम्ही व्हिडीओमधील स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून व्हिडीओ तपासला.

हेही वाचा – गायक लियाम पेनचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडताना लाईव्ह VIDEO आला समोर? नेमकं घडलं काय? वाचा सत्य बाजू

यावेळी आम्हाला एक YouTube शॉर्ट सापडला, ज्यात सलमान खान त्याचा भाऊ अरबाज खानबरोबर संभाषण करताना दिसला.

त्यानंतर आम्ही गूगल कीवर्ड सर्च वापरून सलमानच्या मूळ मुलाखतीपर्यंत पोहोचलो.

ही मुलाखत तीन वर्षांपूर्वी Qu Play वर अपलोड करण्यात आली होती.

मुलाखतीत सलमान कुठेही लॉरेन्स बिश्नोईबद्दल बोलताना दिसला नाही.

आम्ही व्हायरल व्हिडीओची ऑडिओ फाइल Resemble AI an AI डिटेक्टरद्वारे चालवली आणि व्हायरल ऑडिओ बनावट असल्याचे आढळले.

निष्कर्ष :

व्हायरल व्हिडीओ, ज्यामध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईला धमकी देताना दिसत आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून बनवला आहे. त्यामुळे सलमान खानने लॉरेन्स बिश्नोईला कोणतीही धमकी किंवा ओपन चॅलेंज दिलेले नाही, त्यामुळे व्हायरल होणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan threatens lawrence bishnoi fact check video salman khan allegedly threatening lawrence bishnoi is fake sjr