Viral news: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा कालच ५८ वा वाढदिवस झाला. जगभरात कोट्यवधी फॅन्स असलेला सलमान सध्या ‘टायगर ३’ आणि ‘ बिग बॉस १७’ मुळे बराच चर्चेत आहे. गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडवर अधिराज्य करणारा सलमान प्रोफेशनल आयुष्यात खूप पुढे निघून गेला असला तरी खासगी आयुष्यात तो अजूनही सेटल नाहीये.वयाच्या ५८ व्या वर्षीही तो अजूनही सिंगलच आहे, त्याने अद्याप लग्न काही केलेलं नाही. पण सर्वांचा लाडका ‘भाईजान’ लग्न करणार तरी कधी असाच प्रश्न सर्वांना, विशेषत: त्याच्या चाहत्यांना पडतो. दरम्यान सोशल मीडियावर एक जाहिरात तुफान व्हायरल होत आहे. ही जाहिरात एका मॅरेज ब्युरोनं लावली होती आणि त्यावर सलमान खानचा फोटो होता. त्यामुळे सलमान खानच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे जाहिरातीत लिहिले आहे. सोशल मीडियावर ही जाहीरात व्हायरल झाल्यापासून चाहत्यांच्या मनात हाच प्रश्न घोळू लागलाय. ‘ भाईजान, तुझा नंबर कधी ? शादी कब करोगे ?’ असाच सवाल सगळे सलमानला करत आहेत.कर्नाटकातील एका मॅरेज ब्युरोने वृत्तपत्रात जाहिरात टाकून सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा दावा केला जात आहे. यासोबत जाहिरातीत लिहिले आहे की, अविवाहित लोकांना लग्न करायचे आहे, कृपया संपर्क साधा. ही व्हायरल जाहिरात व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली आहे. यासोबतच त्याने कॅप्शनही लिहिले – सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त एका कन्नड वृत्तपत्रात क्रिएटिव्ह जाहिरात आढळली.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
mudassar khan riya kishanchandani welcome baby girl
Video: वर्षभरापूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न, सलमान खानचा जवळचा मित्र झाला बाबा; पत्नीने मुलीला दिला जन्म
The song Yellow Yellow from the movie Fasklass Dabhade is released
‘फसक्लास दाभाडे’मधील ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Anniversary
शोमध्ये पहिली भेट ते श्री व सौ! मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच खास पोस्ट; ‘त्या’ कॅप्शनने वेधलं लक्ष
Bollywood Actress Marathi Film Debut
सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर
Eijaz Khan addresses controversy with Pavitra Punia
अभिनेता एजाज खानने धर्मांतरासाठी एक्स गर्लफ्रेंडवर दबाव टाकण्याच्या आरोपांवर दिलं उत्तर, म्हणाला…

मंगळुरू येथील मंगला मॅरेज ब्युरोने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यात म्हटले आहे की ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत..

पाहा जाहिरात

हेही वाचा >> VIDEO: बोंबला! स्टेजवरच नवरीनं नवरदेवाला चोपलं; दारू पिऊन आलेल्या नवरदेवाला चांगलीच अद्दल घडवली

एका व्हायरल पोस्टवर लोकांनी अशी प्रतिक्रिया दिली

या पोस्टवर एका यूजरने लिहिले की, ‘ही काही पहिली वेळ नाही. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘भाई जान को शादी कर लेनी ज़ाई.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘सलमान भाई हम सिंगल्स के लिए एक मिसाल हैं.’

Story img Loader