सोशल मीडिया अनेक लोकांच्या जीवनात एक आशा म्हणून आला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट व्यतिरिक्त, अशा अनेक गोष्टी वाचल्या जाऊ शकतात, ज्या उत्कृष्ट आणि हृदयस्पर्शी असतात. अलीकडेच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये हे पाहिले जाऊ शकते की एक वृद्ध महिला तिच्या उदरनिर्वाहासाठी पेन विकताना दिसत आहे.

खासदारांची पोस्ट

या वृद्ध महिलेचे नाव रतन आहे. रतन पुण्याच्या एमजी रोडवर पेन विकते. ही पोस्ट राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी व्ही यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.” यासह त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की त्या वृद्ध स्त्रीने तिच्या पेनच्या बॉक्सवर लिहिले आहे की ‘मला भीक मागायची नाही. कृपया १० रुपयांना निळे पेन खरेदी करा. धन्यवाद, आशीर्वाद.’

( हे ही वाचा: Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी)

( हे ही वाचा: Viral Video: तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावणाऱ्या विकृताला अटक, गाझियाबादमधली घटना)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया दिसत आहेत. पोस्टला उत्तर देताना एका वापरकर्त्याने लिहिले आहे – पाहून खरोखर छान वाटले, ती महिला तिच्या अभिमानाशी तडजोड करत नाही.

या पोस्टला आत्तापर्यंत अनेकांनी बघितले आहे तर १०० हून अधिक लोकांनी या पोस्टला रीपोस्ट केलं आहे.

Story img Loader