सोशल मीडियावर कुत्र्या मांजराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ नेटकऱ्यांचे मन जिंकतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिीडओ समोर आला आहे. दोन भिंतीच्यामध्ये एक कुत्र्याचे पिल्लू अडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ हृदयपिळवटून टाकणार आहे. कुत्र्याची अवस्था पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. सुदैवाने कुत्र्याच्या पिल्लाला यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले आहे.. व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्र्याला कशाप्रकारे बाहेर काढले दाखवले आहे.

व्हायरल व्हिडीओ इंस्टाग्रामवर प्रमोद जगताप (pramodspectra )नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहेव्हिडीओच्या कॅप्शनमध्ये दिसते आहे की, दोन भिंतीमध्ये हाताच्या पंजा एवढी फटीत एक कुत्र्याचे पिल्लू अडकले आहे ज्याला काहीच हलचाल करता यत नाहीये. व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, कशाप्रकारे भिंत फोडून कुत्र्याची सुटका केली आहे ते दाखवले आहे.

हेही वाचा – आचारसंहितेनंतर सोशल मीडियावर सरकार, राजकीय पक्षांविरोधात लिहिणाऱ्यांवर होणार कारवाई? व्हायरल दावा खरा की खोटा, वाचा

प्रमोद जगताप यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज दिनांक २७मार्च २०२४ रोजी दुपारी अडीच तीनच्या आसपास ही घटना घडली. माझे मित्र आणि शेजारी संजय यांनी सांगितले की, दोन भिंतीच्या मध्ये कुत्र्याचे छोटेसे पिल्लू अडकलेलं आहे. बहुतेक कालपासून ते तिथे अडकले असावं असा त्यांचा अंदाज होता. त्यानंतर तातडीने त्या लहानशा पिल्लाला तिथून सोडवण्याची प्रयत्न सुरु झाले. छन्नी हातोडा मिळेल ते साहित्य घेऊन भिंत तोडायला सुरुवात केली बराच वेळ भिंत फोडल्यानंतर कुत्र्याचे पिल्लू बाहेर येऊ शकेल अशी जागा तयार झाली आणि सुखरूपरीत्या त्याला बाहेर पडता आले. पिल्लू बाहेर आल्यानंतर त्याने पाणी पिले आणि थोडा वेळ त्याचं निरीक्षण केल्यानंतर ते व्यवस्थित असल्याचे लक्षात आले. पिल्लू सर्वांच्याकडे निवांत पाहत बसले होते. बहुतेक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाहात असावे. पण असो खूप छान वाटलं त्या पिल्लाची सुखरूप सुटका करून”

हेही वाचा – Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तर काहींनी कौतुक केले. व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले, “धन्यवाद मित्रा.” , दुसऱ्याने लिहिले की, “सलाम, एक दिवस लोक प्रत्येक प्राण्याबद्दल अशी काळजी घेतली अशी आशा आहे.” तिसऱ्याने लिहिले की, “उत्तम काम केले भावा, देव तुझे भले करो”

Story img Loader