सह्याद्री पर्वतांच्या कुशी वसलेला महाराष्ट्रानमध्ये ४०० हून अधिक ऐतिहासिक गड आणि किल्ले आहेत. ज्यापैकी काही किल्ली शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करतान जिंकले होते. आजही हे गड आणि किल्ले मावाळ्यांच्या शौर्याची साक्ष देतात. काही किल्ले आता नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहेत. नव्या पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व समजावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे समजून घेण्यासाठी आणि मावळ्यांच्या शौर्य काय आहे हे समजण्यासाठी आपल्या गड आणि किल्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. अशाच एका किल्याचे संवर्धन करणाऱ्या आजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनेक पर्यटक आणि नागरिक मोठ्या संख्येने गड आणि किल्ल्यांना भेट देतात असतात पण खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्यांचा कचरा तेथेच टाकून जातात. एकीकडे बेशिस्त नागरिक आणि पर्यटकांमुळे किल्याचे पावित्र्य खराब होते. दुसरीकडे वय झाले असूनही झाडलोट करणाऱ्या आजी गड आणि किल्ल्याचे आपल्या पद्धतीने संवर्धन करत आहे. हा व्हिडीओ सज्जनगडावरील आहे. किल्याच्या पायऱ्यांचे काम सुरू आहे त्यामुळे येण्या-जाण्याचा मार्गही खराब झाला आहे पण याचा विचार न करता या आजी आपले काम करत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – पाकिस्तानी सैनिकांनी १५ गोळ्या झाडल्या तरी हार मानली नाही”, कॅप्टन योगेंद्र सिंह यांनी सांगितला कारगिल युद्धातील थरारक किस्सा

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर musafir_42 आणि sri_srimantyogi_ या अकांउट वरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आजी गड किल्ल्याचे पावितत्र्य राखण्या साठी या वयात देखील झाडू मारत असतील तर आपण का नाही! आपण दुसऱ्यांनी केलेला कचरा साफ करायचं सोडा पण स्वतःचा कचरा जरी स्वतः कचरापेटीमध्ये टाकला तरी आपल्या गडांचे पावित्र्य जपले जाईल.”

हेही वाचा – तुम्हीही रिकाम्या पोटी चहा पिता का? तुमच्या चुकीच्या सवयींचे आरोग्यावर होतात दुष्परिणाम,जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात…

गडसंवर्धक आजींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक आजींचे कौतूक करत आहे. काही लोक आजीला मदत करण्याचे आव्हान करत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की, या आजी ज्याला कोणाला भेटल्या असेल त्यांनी नुसती मदत नव्हे तर त्यांची चौकशी करणे गरजेची आहे. त्यांना काय तरी मदत मिळले असे काय तरी करावे. जय शिवराय जय मल्हार” तर दुसऱ्याने लिहिले, “महाराजांनी स्त्रीचा केलेला सन्मान या जगात कोणतीच स्त्री विसरणार नाही.. ही एक वाघीण अशी ती कधीच थकत नाही कारणं तिला बाप समजला… त्रिवार मानाचा मुजरा..माणूस म्हातारा होईल पणं शिवविचार नाही.

Story img Loader