त्याची चित्रविचित्र स्वरूपातली गाडी रस्त्यावरून धावू लागली की अनेकजण भुवया उंचावून तिच्याकडे पाहायचे. रस्त्यावरचे लोक तर या चित्रविचित्र गाडीचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याची एक संधी सोडायचे नाही. एखादा तरुण मुलगा आपली गाडी अशापद्धतीने कशी मॉडीफाय करून घेऊ शकतो? याचं कुतूहल अनेकांना होतं, जेव्हा लोकांनी त्याच्याकडे याची चौकशी केली तेव्हा त्याचं उत्तर चक्रावून टाकणारं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : बॉलिवूड गाण्यावर थिरकले फिरंगी पोलीस

साधरण एखाद्या श्वानासारख्या दिसणाऱ्या या गाडीच्या मालकाचं नाव आहे सॅम वेलमॅन. काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेयसीसाठी त्याने गाडी खरेदी केली होती, पण ही गाडी चालवण्याऐवजी ती सारखी सॅमकडून लिफ्ट मागू लागली. कुठेही जायचं असेल तर ती सॅमलाच गाडी चालवायची विनंती करू लागली. तिच्या अशा वागण्यामुळे कंटाळून सॅमनं एक भन्नाट उपाय शोधून काढला. त्यानं आपली गाडी चक्क कुत्र्याच्या आकारात मॉडीफाय करून घेतली. गाडीच्या बाह्यभागावर त्याने कुत्र्याच्या अंगावर असते तशी फर लावून घेतली इतकंच कशाला त्याने गाडीच्या मागे एक छोटीशी शेपटीही बसवली.

६२ हजारांच्या पॉकेटमनीमधून त्याने घेतली बहिणीसाठी स्कूटर!

अशी चित्रविचित्र गाडी पाहून लाजेखातर सॅमच्या प्रेयसीनं गाडीत बसणंच सोडून दिलं, अन् सॅमची ‘प्रियकरवजा चालकाच्या’ भूमिकेतून तुर्तासतरी सुटका झाली आहे. आपण प्रेयसीची फिरकी घेण्यासाठी गाडी मॉडिफाय करून घेतली असली, तरी लोकांना आपली ही भन्नाट कल्पना आवडली असल्याचंही तो सांगतो.