Actress Workout Viral Video : दाक्षिणात्य चित्रपटांच्या माध्यमातून जगभरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. समंथाचा जिममधील फिटनेस वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी समंथा जिममध्ये कंबर कसत असल्याचं व्हिडोओत दिसत आहे. समंथाने आरोग्याच्या समस्यांना सामोरं जात असल्याचं माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. ऑटोइम्यूनचा त्रास होत असल्याचं समंथाने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. पण, समंथाच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. समंथाचा फिटनेसचा व्हिडीओ पाहून लाखे नेटकरी दंग झाले आहेत. समंथाचा जबरदस्त फिटनेस पाहून नेटकरी भन्नाट प्रतिकियांचा वर्षावही करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिममध्ये व्यायाम करताना समंथा खूप फिट दिसत आहे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी समंथा जिममध्ये घाम गाळत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. समंथाच्या या व्हिडीओला लाखो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. समंथाने तिचा फिटनेस व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. समंथा जिममध्ये जबरदस्त वर्कआऊट करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. समंथाच्या अभिनयाचा दाक्षिणात्य इंडस्ट्रीत बोलबोला आहे. अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवण्याबरोबरच तमाम चाहत्यांना समथांने व्हिडीओ शेअर करुन फिटनेस मंत्र दिला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नक्की वाचा – Viral Video: गुजरातमध्ये पैशांचा पाऊस! इमारतीच्या टेरेसवरून उधळले लाखो रुपये, लग्नात काय घडलं?

इथे पाहा व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओला समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. समंथाचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. समंथाचा हा सुंदर व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “खूपच सुंदर व्हिडीओ आहे”. दाक्षिणात्या चित्रपटात अप्रतिम अभिनय सादर करुन समंथा लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनली आहे. कारण समंथाने अभिनय केलेल अनेक दाक्षिणात्य चित्रपट लाखो सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha ruth prabhu workout in the gym video clip went viral on instagram fans shocking reaction after seeing actress fitness nss