Fruit Seller Disgusting Video : काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील एका फळविक्रेत्याचा भररस्त्यातील किळसवाणा व्हिडीओ समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातील संभाजीनगरमधून आता एका फळविक्रेत्याच्या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक फळविक्रेता खुलेआमपणे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसतेय. हा शिसारी आणणारा प्रकार एका व्यक्तीने आपल्या कॅमेरामध्ये कैद केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तम आरोग्यासाठी वारंवार फळं खा असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. यामुळे तुमच्यापैकी अनेक जण बाजारातून येताना तुमच्या आवडीची फळं विकत घेऊन येतात. ही फळं घरातील लहानांपासून सर्वच जण खातात. पण, आरोग्यासाठी उत्तम असणारी ही फळं फळविक्रेते मात्र विष बनवून विकत आहेत. आता या व्हायरल व्हिडीओमध्येच पाहा, एक फळविक्रेता चक्क रस्त्यावरील घाण पाण्यात गोणपाट भिजवतो आणि तेच केळीच्या घडावर आणून टाकतो.

Live Larvae Found in Maggie shocking maggie video goes viral on social media
मॅगी खाताय..सावधान! २ मिनिटांची मॅगी जीवावर बेतू शकते; ‘हा’ VIDEO पाहून यापुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
paneer viral video
तुम्ही खात असलेलं पनीर चांगल की बनावट? ओळखायचं कसं, पाहा VIDEO
shocking video
Video : “जीव एवढा स्वस्त असतो का?” रिल बनवण्यासाठी तरुणीने केला उंच झाडाच्या शेंड्यावर चढून डान्स, व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
Farmers suffer losses due to Nafed closing soybean procurement center says MLA Rohit Pawar
नाफेडने सोयाबीनचे खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान- आ. रोहित पवार
a young girl wanted to marry with a farmer
Video : “लग्न करणार तर फक्त शेतकऱ्याशी…”, तरुणीने स्पष्टचं सांगितलं; नेटकरी म्हणाले, “शेतकऱ्याचे चांगले दिवस आले..”
mom desi jugaad for her pet Dog
जगात भारी आईचा जुगाड! चहात बिस्कीट बुडवण्यासाठी ‘त्याचा’ हट्ट; आईने श्वानाला असं फसवलं; पाहा VIDEO

फळ विक्रेत्याचा अतिशय किळसवाणा प्रकार

हेही वाच – रतन टाटांचे इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स; मात्र ते ‘या’ एकाच अकाउंटला करत होते फॉलो

संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर भागातील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या बाजूला फळं विकायला बसलेला एक विक्रेता फळं ताजी राहावी म्हणून रस्त्यावर साचलेल्या घाणेरड्या पाण्यात एक मोठं गोणपाट भिजवतो आणि तेच गोणपाट आणून केळीच्या घडावर पसरवतो, जेणेकरून उन्हामुळे केळी खराब होणार नाहीत. पण, हीच केळी नंतर तो ग्राहकांना विकणार, त्यामुळे या घाणेरड्या प्रकाराने तो ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत आहे. फळविक्रेता कशाप्रकारे ते गोणपाट रस्त्यावरील अस्वच्छ पाण्यात भिजवतो आणि केळीच्या घडांवर आणून टाकतो हे व्हिडीओत स्पष्ट दिसतेय.

भयानक! बघता बघता शेकडो पर्यटकांनी भरलेली बोट खोल समुद्रात बुडाली; Viral Video खरंच गोव्याचा आहे का? वाचा सत्य….

त्यामुळे फळविक्रेत्याच्या या कृतीचा आता संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या प्रकरणी फळ विक्रेत्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडीओवर तुमचं काय मत आहे, आम्हाला सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा.

Story img Loader