Sambhal Violence Fact Check : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाला जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी उफाळून आलेल्या जातीय हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डझनभर लोकांना अटक केली आणि ४०० हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारनेही या जातीय हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

संभलमधील जातीय हिंसाचारादरम्यान सोशल मीडिया वेबसाइट्सवरही संभलबाबत मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती पसरवली जात आहे. अनेक खोट्या दाव्यांसह फोटो, व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. अशात लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळून आले; ज्यामध्ये संभलच्या जामा मशिदीत चकमक आणि तोडफोड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, खरंच अशा प्रकारची काही घटना घडली का याबाबत आम्ही तपास केला तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं, ते नेमकं काय आहे ते जाणून घेऊ….

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर firo.jkhan9913 ने हा व्हिडीओ त्याच्या अकाउंटवरून शेअर केला असून, तो संभल येथील जामा मशिदीचा असल्याचा दावा केला आहे.

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करीत आहेत.

तपास :

सर्वप्रथम आम्ही InVid टूलवर व्हिडीओ अपलोड केला. यावेळी मिळालेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.

मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी (पूर्व) या तीनही जागा खरंच AIMIM ने जिंकल्यात का? व्हायरल दावा खरा की खोटा? वाचा

ज्याद्वारे आम्हाला ९ ऑक्टोबर २०२४ रोजी एक्सवरील एक पोस्ट मिळाली.

पोस्टमध्ये म्हटले आहे की : त्रिपुरा : जातीय हिंसाचारात कदमताला बाजार मशिदीची तोडफोड

त्यानंतर आम्ही त्यावर Google कीवर्ड सर्च केले. ज्याद्वारे आम्ही एका बातमीपर्यंत पोहोचलो.

https://indianexpress.com/article/india/week-after-kadamtala-clashes-communal-tension-sparks-in-north-tripura-again-9621959/

बातमीत नमूद केले होते की : उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील कदमताला येथे झालेल्या जातीय हिंसाचारात एक व्यक्ती ठार आणि सुमारे १७ जण जखमी झाले आहेत. जवळपास आठवड्यानंतर त्याच जिल्ह्यातील पेकुचेरा, पानीसागर भागात मंगळवारी तणाव निर्माण झाला. आज सकाळी शिव मंदिराचे नुकसान झाल्याचे आढळून आल्यानंतर अशांतता निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मशीद संकुलातील एका बांधकामाधीन इमारतीवर हल्ला झाला.

आम्हाला siasat.com च्या न्यूज रिपोर्टवरदेखील व्हायरल व्हिडीओशी हुबेहूब मिळता-जुळता एक स्क्रीनशॉट सापडला.

https://www.siasat.com/1-killed-amid-communal-clash-in-tripura-mosque-vandalized-shops-looted-3110414/

त्यावेळी एक्सवरदेखील कीवर्ड सर्च करून आम्ही थेट संभल पोलिसांच्या एक्स हॅण्डलवर पोहोचलो, जिथे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते की, व्हिडीओचा संभल जिल्ह्यातील जामा मशिदीशी संबंध नाही. हा व्हिडीओ त्रिपुरातील कदमताला घटनेशी संबंधित आहे.

निष्कर्ष :

त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या वेळी कदमताला येथील एका मशिदीच्या तोडफोडीचा व्हिडीओ संभलच्या जामा मशिदीच्या तोडफोडीचा असल्याचे सांगून खोट्या दाव्यासह शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader