Samsung Galaxy S25 Series Launch In India : दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग जानेवारी महिन्याच्या शेवटी होणाऱ्या गॅलॅक्सी अनपॅक इव्हेंटमध्ये (Galaxy Unpacked event) सॅमसंग गॅलॅक्सी एस २५ सीरिज (Samsung Galaxy S25) AI वैशिष्ट्यांसह लाँच करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एस २५ सीरिजमध्ये गॅलॅक्सी एस २५, गॅलॅक्सी एस २५ प्लस व गॅलॅक्सी एस २५ अल्ट्रा यांचा समावेश असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गॅलॅक्सी अनपॅक इव्हेंट या वर्षी २२ जानेवारी २०२५ रोजी कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे हा कार्यक्रम सकाळी १० वाजता किंवा ११ वाजून ३० मिनिटांनी आयोजित केला जाईल (भारतीय वेळ). हा मेगा इव्हेंट Samsung.com, Samsung Newsroom आणि त्याच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह-स्ट्रीम केला जाईल, जो तुम्हालाही लाइव्ह पाहता येईल. नवीन मॉडेल्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे मुख्य आकर्षण असणार आहे. सॅमसंगने नवीन मॉडेलचे वर्णन “अधिक नॅचरल आणि Intuitive Galaxy AI” म्हणून केले आहे.

हेही वाचा…नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा! रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात होणार लाँच; थंड तापमानात रंग बदलणार

(फोटो सौजन्य: Google Trends)

प्री-रिझर्व्ह ऑफर आणि प्री-बुकिंग तारीख (Samsung Galaxy S25 )

कंपनीने सॅमसंग इंडिया स्टोअरद्वारे भारतात गॅलॅक्सी एस २५ मालिकेसाठी प्री-रिझर्व्ह सुरू केले आहे. आजपासून १,९९९ रुपये भरून फोन प्री-रिझर्व्ह करून ग्राहकांना पाच हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची प्री-बुकिंग २२ जानेवारीपर्यंत सुरू राहतील.

प्री-ऑर्डर आणि विक्री कधी?

सॅमसंग गॅलॅक्सी एस २५, सॅमसंग गॅलॅक्सी एस २५ प्लस व सॅमसंग गॅलॅक्सी एस २५ अल्ट्रा गॅलॅक्सी अनपॅक इव्हेंटच्या दोन दिवसांनंतर किंवा शुक्रवारी २४ जानेवारी रोजी प्री बुकिंग सुरू होईल आणि मंगळवारी ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्री बुकिंग सुरू राहतील. त्याचप्रमाणे सॅमसंग गॅलॅक्सी एस २५ सीरिज शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२५ रोजी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एस २५ सीरिजच्या (Samsung Galaxy S25 ) सर्व व्हेरिएंटमध्ये पॉवरफूल स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर, ऑफर म्हणून १२ जीबी रॅमसह येईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. फ्लॅगशिप मॉडेल्सच्या बरोबरीने, गॅलॅस्की एस २५ स्लिम प्रकार वर्षाच्या शेवटी लाँच होईल. अपग्रेड कॅमेरा, सुधारित चार्जिंग स्पीड, ॲपलसारख्या मॅगसेफ चार्जिंगसाठी Qi2 वायरलेस चार्जिंग आदी अनेक फीचर्स दिले जातील. स्लिमर बेझल्सने डिझाईन वाढवल्यामुळे स्टॅण्डर्ड गॅलॅक्सी एस २५ मध्ये 4,000mAh बॅटरी तर प्लस आणि अल्ट्रा मॉडेल्समध्ये अनुक्रमे 4,900mAh आणि 5,000mAh बॅटरी असू शकते, असे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy s25 series launch in india with ai features check pre booking date and pre reserve offers google trends asp