Samsung Galaxy A56 Galaxy A36 Features : स्मार्टफोन वापरायला आपल्यातील प्रत्येकालाच मजा येते. पण, कंटाळा तेव्हा येतो, जेव्हा हा फोन कधी कधी प्रत्येक महिन्याला अपडेट करावा लागतो. अपडेट केला नाही की, मग हा फोन हँग होण्यास सुरुवात करतो. मग त्यासाठी स्मार्टफोन स्मूथ बनवण्यासाठी कंपन्या वेळोवेळी नवीन सॉफ्टवेअर आणत असतात आणि अनेक कंपन्या जुन्या स्मार्टफोनमध्ये हे सॉफ्टवेअर ओटीए (ओव्हर टू एअर)द्वारे अद्ययावतही करतात; पण काहींना अद्ययावत केल्याशिवाय पर्याय नसतो. पण, आता तुमची चिंता कमी करण्यासाठी सॅमसंग कंपनी खास गोष्ट घेऊन आली आहे.

सॅमसंगने सोमवारी ३ मार्च २०२५ रोजी भारतात गॅलॅक्सी ए (Galaxy A) सीरिजचे Galaxy A56, Galaxy A36 व Galaxy A26 असे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या सर्व ए सीरिज फोन्सना सिक्स जनरेशन ऑफ अँड्रॉइड ओएस (six generations of Android OS), वन युआरय अपग्रेड (One UI upgrades ) व स्मार्टफोनमध्ये सहा वर्षांची सिक्युरिटी अपडेट (six years of security updates) देण्यात आले आहेत.

दक्षिण कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने इरेजर, समराईज (Summarise म्हणजेच सारांश), सर्कल टू सर्च, बेस्ट फेस, ऑटो ट्रिम, ऑटो ट्रिम, मोठ्याने वाचणे (read aloud) यांसारख्या फीचर्ससह नवीन ए सीरिजमध्ये गॅलॅक्सी एआय (Galaxy AI) सादर केला आहे. गॅलॅक्सी एआय Galaxy A मालिकेतील Galaxy A56, Galaxy A36 व Galaxy A26 च्या या प्रत्येक फोनमध्ये IP67रेट करण्यात आले आहे. त्याचबरोबर तिन्ही फोनमध्ये ६.७ इंच एफएचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्लेसह 120 Hz रिफ्रेश रेट, 1,200 nits पीक ब्राइटनेस, 5,000mAh बॅटरी आणि १२८ जीबी ते २५६ जीबी पर्यंत स्टोरेज देतात. तर स्मार्टफोनमध्ये रॅम ६ जीबीपासून सुरू होते आणि १२ जीबीपर्यंत असणार आहे.

त्याचप्रमाणे Galaxy A56 आणि Galaxy A36 स्मार्टफोनमध्ये 45W चार्जिंग तर Galaxy A26 ला 25W पर्यंत चार्जिंग सपोर्ट मिळतो. Galaxy A56 स्मार्टफोन 5G Exynos 1580 चिपसेटवर चालतो आणि Galaxy A36 5G मध्ये Snapdragon 6 Gen 3 SoC आहे. Galaxy A26 मध्ये Exynos 1380 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच प्रत्येक फोन बॉक्सच्या बाहेर Android 15 वर आधारित One UI 7 वर ऑपरेट करतो. तसेच गॅलॅक्सी Galaxy A56 व Galaxy A36 मध्ये १२ एमपी (12 MP) फ्रंट कॅमेरा आणि गॅलॅक्सी ए २६ मध्ये १३ एमपी फ्रंट लेन्स दिले जात आहेत.

Galaxy A56 Galaxy A36 and Galaxy A26 Launched In India

(फोटो सौजन्य: Google Trends)

गॅलॅक्‍सी ए५६ ५जी

मेमरी किंमतनेट इफेक्टिव्ह प्राईजलाँच ऑफररंग पर्याय
१२ जीबी २५६ जीबी४७,९९९ रूपये४४,९९९ रूपये८ जीबी २५६ जीबी व्हेरिएंटच्या किमतीमध्‍ये १२ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा.ऑसम ऑलिव्‍ह, ऑसम लाइटग्रे, ऑसम ग्रॅफाईट
८ जीबी २५६ जीबी४४,९९९ रूपये४१,९९९ रूपये८ जीबी १२८ जीबी व्हेरिएंटच्या किमतीमध्‍ये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा.ऑसम ऑलिव्‍ह, ऑसम लाइटग्रे, ऑसम ग्रॅफाईट
८ जीबी १२८ जीबी४१,९९९ रूपये४१,९९९ रूपये
गॅलॅक्‍सी ए३६ ५जी
मेमरी किंमतनेट इफेक्टिव्ह प्राईजलाँच ऑफररंग पर्याय
१२ जीबी २५६ जीबी१२ जीबी २५६ जीबी३५,९९९ रूपये८ जीबी २५६ जीबी व्हेरिएंटच्या किमतीमध्‍ये १२ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा.ऑसम ब्‍लॅक, ऑसम लव्‍हेंडर, ऑसम व्‍हाइट
८ जीबी २५६ जीबी३५,९९९ रूपये३२,९९९ रूपये८ जीबी १२८ जीबी व्हेरिएंटच्या किमतीमध्‍ये ८ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा.ऑसम ब्‍लॅक, ऑसम लव्‍हेंडर, ऑसम व्‍हाइट

ऑफर :

प्रायमरी स्टोरेज अपग्रेड ऑफर व्यतिरिक्त, ग्राहकांना २ हजार ९९९ च्या मूळ किमतीच्या तुलनेत फक्त ९९९ मध्ये Samsung Care+ एक वर्षाचे स्क्रीन प्रोटेक्शन देखील मिळू शकते. ग्राहक Galaxy A56 5G वर १८ नो कॉस्ट ईएमआ आणि Galaxy A36 5G वर १६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआ घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, निवडक व्यवहारांसाठी सॅमसंग वॉलेट वापरल्यास ग्राहकांना ४०० पर्यंत Amazon व्हाउचर मिळेल.

Story img Loader