अॅपलचा बहुप्रतिक्षित अॅपल ‘आयफोन X’ गेल्याच महिन्यात लाँच झाला. याचवेळी सॅमसंगने देखील आपला फोन भारतात लाँच केला. या दोन्ही कंपन्या प्रतिस्पर्धी असल्या तरी अॅपलच्या ‘आयफोन X’मुळे सॅमसंग कंपनीला मोठा फायदा होत असल्याचं समोर आले आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या माहितीनुसार, सॅमसंगला गॅलेक्सी S8 च्या विक्रीतून जितका फायदा झाला नाही त्यापेक्षा कैक पटीने अधिक फायदा हा ‘आयफोन X’च्या विक्री मुळे होत आहे.
Viral : चलनी नोटा कापून वही सजवणारी मुलगी आहे तरी कोण?
जर प्रतिस्पर्धी कंपनीच्या फोनचा खप अधिक होत असेल तर त्याचा सॅमसंगला कसा फायदा होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण यामागचं कारण वेगळं आहे. सॅमसंग कंपनी अॅपलला आयफोन x च्या निर्मितीसाठी लागणारे OLED पॅनल्स, NAND फ्लॅश आणि DRAM चिप पुरवते. सध्याच्या घडीला ओएलइडी, फ्लॅश आणि चीप अॅपलाला पुरवणारी सॅमसंग ही एकमेव मोठी कंपनी आहे. एका फोनमागे सॅमसंगला ११० डॉलर म्हणजे म्हणजे जवळपास ७,२१० रुपयांचा नफा होत आहे.
… म्हणून मार्क झकरबर्गने मागितली जाहीर माफी
वॉल स्ट्रीटच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या एकूण नफ्यापैकी ३५ टक्के नफा सॅमसंगला केवळ आयफोनच्या विक्रीतून होत आहे. जसा आयफोन X’चा खप वाढत जाईल तशी नफ्यात वाढ होत जाईल, त्यामुळे आता अॅपल OLED पॅनल्ससाठी दुसरा पुरवठादार शोधत असल्याच्याही चर्चा आहेत.