सॅमसंग गॅलक्सी नोट ७ मुळे सॅमसंग कंपनी चांगलीच चर्चेत आली होती. मोठा गाजावाजा करत सॅमसंगने हा फोन बाजारात आणला होता. पण याच फोनने सॅमसंगची आंतरराष्ट्रीय बाजारात चांगलीत नाचक्की केली होती. या फोनच्या बॅटरीचा स्फोट होणा-या अनेक घटना गेल्या वर्षभरात घडल्या होत्या. त्यामुळे या फोनचे उत्पन्नच कंपनीने थांबवले होते. अखेर या फोनच्या बॅटरी स्फोटामागचे कारण सॅमसंगने स्पष्ट केले आहे.

वाचा : माझा फोन १०० टक्के चार्ज कधी होणार ? अमिताभ बच्चन यांचा सॅमसंगला सवाल

बॅटरीचा स्फोट होण्याची कारणे शोधण्यासाठी या कंपनीचे संशोधन सुरु होते. यावर अधिक अभ्यास करून त्यासंदर्भातील अहवाल प्रकाशीत करण्यात आला. या अहवालात गॅलक्सी नोट ७ मधील स्फोटाची कारणे सॅमसंगकडून स्पष्ट करण्यात आली. फोनमधील दोष आणि अंतर्गत कारणांमुळे बॅटरी स्फोटाची समस्या उद्भवली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. या स्फोटामागे इंटर्नल शॉर्ट-सर्किटची समस्या देखील कारणीभूत असल्याचे सॅमसंगने स्पष्ट केले आहे. मुळात गॅलक्सी नोट ७ हा अतिशय स्लिम होता. तसेच याचे कोपरे चारही बाजूने वक्रावार होते. जेव्हा हा फोन चार्ज केला जायचा तेव्हा बॅटरी गरम व्हायची आणि तिला पसरायला जागा न मिळाल्याने तिचा स्फोट व्हायचा असे समोर आले.

viral video : ‘सॅमसंग नोट ७’ ने घेतला पेट

सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ चा स्फोट होत असल्याने या कंपनीने आपले उत्पन्न थांबवले होते. तर या कंपनीने सदोष बॅटरीमुळे आपले ४ लाखांहूनही अधिक फोन ग्राहकांकडून परत मागवले होते. बॅटरीच्या स्फोट होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने अनेक विमान कंपन्यांनी हा फोन विमानातून नेण्यास देखील बंदी घातली होती. हा फोन मोठ्या गाजावाजात बाजारात आणला होता पण नंतर मात्र बॅटरीच्या स्फोट होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या, त्यामुळे या मॉडेलचे उत्पन्न सॅमसंगकडून थांबवण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी सॅमसंगने तीन चौकशी समिती नेमल्या होत्या. याचा अहवाल आता प्रकाशित करण्यात आला. अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विट करत सॅमसंगला माझा फोन १०० टक्के चार्ज कधी होणार असा प्रश्न विचारला होता. ‘आपल्याकडे असलेल्या ‘नोट ७’ ची बॅटरी मर्यादा ६० टक्क्यांपर्यंत दाखवते, त्यामुळे माझा फोन हा १०० टक्के चार्ज कधी होणार ? असे ट्विट त्यांनी केले होते. पुढे ‘मिस्टर सॅमसंगने’ म्हणजेच या कंपनीने त्यांच्या प्रश्नाचे लवकरात लवकर उत्तर देण्याची विनंतीही त्यांनी केली होती. तर सोशल मीडियावर देखील या फोनचे पेट घेतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.

वाचा : विमान प्रवासात सॅमसंग नोट ७ वर निर्बंध

Story img Loader