जाहिरातींचे विश्वच कमालीचे असते नाही का? माणसांची नेमकी दुखती नस ओळखायची आणि तिच पकडून आपल्या उत्पादनांची जाहिरात करायची हा यांचा मेन फंडा. माणसांच्या भावना, त्या गोष्टींबद्दल असणारी त्यांची अटॅचमेंट, मागणी, गरज या सा-या गोष्टींचा मेळ साधत अशी काही जाहिरात बनवायची की ज्याची छाप लोकांवर पडलीच पाहिजे. पण काही जाहिराती या यापलिकडे असतात, फक्त जाहिरातबाजीच नाही तर त्यात एक संदेशही दडला असतो किंवा कधी एखादी प्रेरणादायी गोष्टही सांगितली जाते म्हणूनच तर या जाहिराती हटके असतात ना! सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली सॅमसंग VR गिअरची जाहिरात त्यातलीच एक आहे.

Viral : बेपत्ता शेतकरी अजगराच्या पोटात सापडला

वाचा : अय्यो! आमदाराच्या लक्झरी कारमध्ये पट्रोलऐवजी डिझेल भरलं ना

एक शहामृग खाण्याच्या शोधात टेबलपाशी येतो अन् टेबलवरचं अन्न चोचीत टिपताना टेबलवर ठेवलेला VR गिअर अपघाताने त्याच्या चेह-यावर अडकतो. सुरूवातीला हे गिअर काढण्याचे तो प्रयत्न करतो, पण लगेच या गिअरवर त्याला आकाश दिसू लागते. VR म्हणजेच व्हच्युअल रिअॅलिटीमुळे आपण जणू आकाशात तंरगत असल्याचा त्याला भास होतो. त्यामुळे तो तर हवेतच असतो. हा VR गिअर लावून तो अनेकदा आकाशात उडण्याचा प्रयत्न करतो पण यश काही येत नाही, पण तो प्रयत्नही सोडत नाही आणि एकदिवस तो या आकाशात उडून दाखवतोच. तसं पाहायला गेलं शहामृग कधीच उडू शकत नाही, पण ‘जे शक्य नाही ते करून दाखवाच’ असा संदेश यातून त्यांनी दिला आहे. त्यामुळे जाहिरात जरी काल्पनिक असली तर त्यामागचा विचार मात्र सगळ्यांना खूपच आवडला आहे.

Story img Loader