टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री असलेली सना खान भलेही ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दुरावली असेल पण ती नेहमीच चर्चेत असते. काही वर्षांपूर्वीच सना गुजरातचे उद्योगपती मुफ्ती अनस सय्यद यांच्यासोबत लग्न करून बॉलिवूडपासून दूर झाली. मात्र सना पूर्वीप्रमाणेच आताही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो शेअर करत असते. आता सनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जगातील सर्वात उंच रेस्टॉरंटमध्ये गोल्ड टी पिताना दिसत आहे.

दुबईतील बुर्ज खलिफा येथील जगातील सर्वात उंच रेस्तराँ अ‍ॅटमॉस्फियर दुबई येथे सना खान सोन्याचा मुलामा असलेला चहा पिताना दिसली. सना खानने आपले फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘आपल्या जीवनाची तुलना त्यांच्याशी कधीही करू नका जे चुकीच्या पद्धतीने कमावलेल्या गोष्टींचा आनंद घेतात. या जगात ते अधिक यशस्वी दिसतात परंतु अल्लाहसमोर ते काहीच नाहीत आणि तेच महत्त्वाचे आहे.’

Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding first photo
नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष

अ‍ॅटमॉस्फियर दुबईच्या लॉंजमध्ये बसून सना ही सोन्याचा मुलामा दिलेली चहा पित होती. हे रेस्तराँ, जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले रेस्तराँ असल्याचा दावा करते. इथला चहा आणि जेवण खूप महाग आहे. सनाने प्यायलेल्या गोल्ड प्लेटेड चहाची किंमत १६० दिरहम म्हणजेच सुमारे ३३०० रुपये आहे. या सोन्याच्या चहाची किंमत ऐकून नेटकरी चकित झाले आहेत.

सनाचे पती मुफ्ती अनस सय्यद हे गुजरातमधील सुरत येथील एक मोठे व्यापारी आणि इस्लामिक विद्वान आहेत. त्यांच्या कुटुंबाचा हिऱ्यांचा व्यवसाय आहे. २१ नोव्हेंबर २०२० ला सनासोबत लग्न केल्यानंतर ते चर्चेत आले होते. सना आपल्या पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अनसकडे अनेक आलिशान बंगले आणि आलिशान वाहने आहेत. सनाही तिच्या पतीसोबत खूप अभिमानाने आयुष्य जगते.

Story img Loader