सुदर्शन पट्टनायक [Sudarsan Pattnaik] या प्रसिद्ध वाळू शिल्पकाराने विराट कोहलीला त्याच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त, समुद्रावर वाळूच्या सहाय्याने सुंदर शिल्प साकारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुदर्शन यांनी ओडिसामधील पुरी या समुद्रकिनाऱ्यावर हे सुंदर शिल्प साकारले असून त्यांना त्यांच्या क्लिष्ट, पण अत्यंत सुबक अशा वाळूशिल्पांसाठी ओळखलं जातं. अशा त्यांच्या आगळ्यावेगळ्या कलेचा वापर करून त्यांनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे शिल्प जवळपास एखाद्या व्यक्तीच्या आकाराएवढं असून, त्या शिल्पामध्ये निळ्या रंगाची भारतीय क्रिकेट टीमची जर्सी घातलेल्या विराट कोहलीच्या आकृतीमागे, अनेक क्रिकेटच्या बॅट्स आणि चेंडूंनी हे शिल्प तयार झालेलं आपल्याला दिसत आहे.

हेही वाचा : तेलकट पदार्थांमुळे चेहऱ्यावर सतत येतात पिंपल्स? पहा काय आहेत उपाय; समज आणि गैरसमज

सुदर्शन यांनी तयार केलेले हे शिल्प त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून पोस्ट केले आहे आणि त्याचं कॅप्शन काहीसं असं आहे, ‘क्रिकेट या खेळात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या आणि सर्वांचा आदर्श असणाऱ्या @imVkohli विराट कोहलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी ओडिसामधील पुरी समुद्रावर तयार केलेले हे वाळूशिल्प आहे.’

या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, विराट कोहलीसाठी तयार केलेल्या या खास शिल्पासाठी अनेकांनी खूप आभारदेखील मानले आहेत.

विराट कोहलीचे खेळातील कौशल्य आणि क्रिकेटमधील कामगिरीने अनेक तरुणांना प्रेरित केले आहे. ज्यांना विराट कोहलीबद्दल प्रेम आणि आदर वाटतो, त्यांच्यासाठी सुदर्शन यांनी तयार केलेलं हे शिल्प म्हणजे पर्वणीच आहे, असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sand artist gives amazing birthday wishes to virat kohli on his birthday dha