Sangola Farmer Success Story : शेतीत प्रगती नाही, पिकांना भाव नाही असं आपण अनेकवेळा एकलं असेल. मात्र परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड दिल्यास नक्कीच प्रगती शक्य आहे. आपल्या भारतात अनेक शेतकरी करोडपती आहेत. दरवर्षी ते आपल्या शेतातून करोडो रुपयांचा उत्पन्न काढून त्यांनी मोठी आर्थिक प्रगती करतात. अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मराठी शेतकऱ्यानं सर्वांनाच चकित केलंय. आश्चर्याची बाब म्हणजे या शेतकऱ्यानं गायीचं शेण विकून तब्बल १ कोटी रुपयांचा बंगला बांधलाय. मोठमोठ्या उद्योजकांनी म्हटलंय की व्यवसाय करण्यासाठी भरपूर पैसे नाही तर तुमच्याकडे एक चांगली कल्पना असणं गरजेचं आहे. अन् या शेतकऱ्यानं तेच करून दाखवलं. जे शेण लोक कचऱ्यात फेकून देतात त्याच शेणापासून त्यानं कोट्यवधींचा उद्योग उभा केलाय.
या शेतकऱ्याचं नाव प्रकाश नेमाडे असं आहे. ते सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावात राहतात. शेतकरी प्रकाश इमडेंना वडिलोपार्जित चार एकर कोरडवाहू जमीन होती. तसेच त्यांच्याकडं एक गाय होती. त्या एका गायीपासून सुरु केलेल्या दूध व्यवसायात आज तब्बल १५० गायींमध्ये रुपांतरीत झाला आहे. प्रकाश इमडे हे रोज एक हजार लिटर दूध डेअरीला देत आहेत. एखाद्या कार्पोरेट कंपनीला लाजवेल असे नियोजन केल्यामुळं या अशिक्षित शेतकऱ्याने अल्पावधीत आपलं वेगळं वैभव उभं केलं आहे.
गायीचा फोटो देवघरात
दूध आणि शेणातून वर्षाकाठी तब्बल दीड कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या या प्रकाशबापूंशी बोलताना त्यांच्या अफाट अनुभव आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची सांगड घालून व्यवसाय कसा करावा याचे धडे तरुणांना मिळू शकतात. सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावातील प्रकाश इमडे हे अल्पभूधारक शेतकरी. मात्र, त्यांनी आपल्या एका गायीपासून उभारलेलं वैभव भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावते. व्यवसायाला साथ दिलेल्या या गायीचा फोटो आज त्यांच्या देवघरात आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय इमडे कुटुंबीय आपल्या दिवसाची सुरुवात करत नाहीत. या गायींच्या शेणापासून इमडेंनी एक कोटींचा टोलेजंग बंगला आपल्या रानात उभारला आहे. या बंगल्याला नावही ‘गोधन’ निवास दिलं आहे. घरावर या गायीचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Accident Viral Video: तामिळनाडूत ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात, वडिलांचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
प्रकाश यांचे हे वैभव पाहण्यासाठी रोज राज्यभरातून व इतर राज्यातूनही दूध व्यावसायिक भेट देतात. आज प्रकाश यांच्या गोठ्यात तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांच्या व्यवसायामुळं आज गावात अनेकांना रोजगार मिळाले आहे.