Shoaib Malik Dancing PAK vs NZ: टी २० विश्वचषकात सुपर १२ च्या सामन्यात गट २ मध्ये अर्ध्याहून अधिक सीझन शेवटला असणारी टीम म्हणजे पाकिस्तान. पण नेमक्या महत्त्वाच्या वेळी पाकिस्तानला हरवलेला सूर गवसला आणि आता न्यूझीलँड या बलाढ्य संघाला हरवून पाकिस्तान टी २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचलेला पहिला संघ ठरला आहे. १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान टी २० विश्वचषक मायदेशी घेऊन जाण्यासाठी लढणार आहे. आज टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड या उपांत्य फेरीत विजयी ठरणारा संघ पाकिस्तानला आव्हान देणार आहे. पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत दाखल झाल्याने अनेक माजी पाकिस्तानी खेळाडू सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. मात्र शोएब मलिक व वसीम अक्रम यांचा सेलिब्रेशन व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
खेळानंतर, शोएब मलिक, वसीम अक्रम, मिसबाह-उल-हक आणि वकार युनूस या पाकिस्तानी खेळाडूंनी स्टुडिओमध्येच भांगडा करत पाकिस्तानचा विजय सेलिब्रेट केल्याचे दिसत आहे. एकीकडे पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब मलिक यांचे खाजगी आयुष्यही सध्या चर्चेत आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झासह घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना शोएब मलिकचा हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाकिस्तान जिंकताच शोएब मलिकचा व्हिडीओ व्हायरल…
IND vs ENG: ‘यांना’ टीममध्ये घ्यायची काय गरज..; सुनील गावस्कर भडकले, रोहित शर्माला सुनावले खडेबोल
PAK vs NZ हायलाईट्स
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर १५३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते.
कर्णधार विल्यमसनने मधल्या फळीत फलंदाजी करताना ४२ चेंडूंत ४६ धावा केल्या. तर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत विराट कोहली आणि ख्रिस गेलनंतर दोन अर्धशतके झळकावणारा डॅरिल मिशेल न्यूझीलँडसाठी हुकुमी एक्का ठरला.
मात्र १५४ धावा हे पाकिस्तानसाठी तितकेसे कठीण आव्हान नव्हतेच. पाकिस्तान कर्णधार व सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी १०५ धावांची भागीदारी करत पाकिस्तानच्या खेळीची दमदार सुरुवात केली. तर मोहम्मद हरीसने ३० धावा करत पाकिस्तानचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. रिझवानने पाच चौकारांसह ५७ धावा करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.