गेल्या काही दिवसांपासून भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यामध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. २०१० साली या दोघांनी लग्न केले असून त्यांना इझान नावाचा एक मुलगा आहे. मात्र असे मानले जात आहे की या जोडप्यामधील अंतर वाढत असून ते दोघे लवकरच विभक्त होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सानिया आणि शोएबच्या लग्नाला आता १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. एप्रिल २०१० मध्ये अतिशय वादग्रस्त प्रसंगामध्ये त्यांचं लग्न झालं होतं. मात्र, इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच या दोघांमध्ये काहीही ठीक नसल्याच्या अफवांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी शोएब आणि सानिया यांनी एकत्रितपणे त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. शोएबने यासंबंधीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. मात्र सानियाने यासंबंधी कोणतीही पोस्ट केली नाही. मात्र सानियाने नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुलीचं स्वप्न पूर्ण झाल्यावर पित्याला आकाशही झाले ठेंगणे; अतिआनंदाने झाली अशी अवस्था की…; एकदा हा Video पाहाच

शोएब आणि सानिया विभक्त होण्याच्या चर्चांना सानियाच्या नव्या इन्स्टाग्राम स्टोरीने हवा दिली आहे. सानिया मिर्झाने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले, “तुटलेली हृदये कुठे जातात? अल्लाला शोधण्यासाठी.” या पोस्टमुळे या दोघांचेही चाहते चिंतेत आहेत.

सानिया आणि शोएबमधील नाते बिघडण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पाकिस्तानमधील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, शोएब मलिकने त्याच्या एका टीव्ही शोमध्ये सानियाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे जोडपे आता वेगळे झाले असून काही काळापासून ते वेगळे राहत असल्याचेही पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे. तथापि, या दोघांनीही या गोष्टीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Photos : लग्नाच्या १२ वर्षांनंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक होणार वेगळे? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

दरम्यान, सानिया मिर्झाने शेअर केलेली ही पहिलीच अशी पोस्ट नाही. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंय, “मला सर्वात कठीण दिवसांतून बाहेर आणणारे क्षण.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirza shares cryptic post amid divorce rumours with shoaib malik said where do broken hearts go pvp