Sanjay Raut On Dawood Ibrahim Fact Check Video : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे लाईटहाऊस जर्नलिझमला आढळून आले. तीन सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपमध्ये संजय राऊत ‘आपले सरकार एक दिवस दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल’ असे म्हणताना ऐकू येत आहे. या व्हिडीओतून संजय राऊतांनी उद्धव ठाकरे गटाचे सरकार आल्यावर दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा केला जात आहे, ज्यामुळे संजय राऊत यांनी खरंच असे कोणते विधान केले का याबाबतची सत्यता तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा या व्हायरल व्हिडीओची सत्य बाजू समोर आली, ती नेमकी काय? जाणून घेऊ…
.
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक युजर “भाजपा येणार मुंबई घडवणार”ने हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ यापूर्वी त्याच पेजच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरही शेअर करण्यात आला होता.
तपास :
संजय राऊत यांनी असे विधान केले होते का हे पाहण्यासाठी आम्ही फक्त कीवर्ड सर्च करून तपास सुरू केला.
आम्हाला या वर्षी जुलै महिन्यातील काही बातम्या आढळल्या.
या बातमीच संजय राऊत यांनी केलेले विधान, “शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्यानंतर आता या सरकारकडून केवळ दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देणं बाकी आहे’, असे नमूद करण्यात आले आहे.
हॉटेल पुनर्विकास प्रकरणात शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना क्लीन चिट दिल्यानंतर महाविकास आघाडीने भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला फटकारले होते. महाविकास आघाडी नेत्यांनी म्हटले की, भाजपाचे वॉशिंग मशीन आता पुन्हा सक्रिय झाली आहे, यावर संजय राऊत यांनी म्हटले की, विद्यमान महाराष्ट्र सरकारकडून आता फक्त फरार गुंड दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देणं बाकी आहे.
एएनआयच्या यूट्यूब चॅनेलवर आम्हाला संजय राऊत यांची पत्रकार परिषद लाइव्ह स्ट्रीम होत असल्याचे आढळले.
२३ ऑक्टोबर २०२४ रोजी संजय राऊतांचा पीसी व्हिडीओ स्ट्रीम झाला आहे, व्हिडीओमध्ये सुमारे १५ मिनिटे २० सेकंदावर एक पत्रकार संजय राऊत यांना सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना हिंडेनबर्ग प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याबद्दल प्रश्न विचारतो, ज्यावर संजय राऊत उत्तर देतात की, “बघा, एक दिवस हे सरकार दाऊद इब्राहिमलाही क्लीन चिट देईल.
चरणामृत समजून भाविक पितायत एसीचे पाणी; बांके बिहारी मंदिरातील धक्कादायक VIDEO
हेच विधान त्यांनी अनेक वेळा केले.
निष्कर्ष : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी त्यांचे सरकार आले तर दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल असे म्हटलेले नाही. त्यांच्या विधानांचा व्हिडीओ एडिट करून भ्रामक दाव्यांसह शेअर केला जात आहे, त्यामुळे संजय राऊतांविषयी केला जात असलेला व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.